Maharashtra Politics | उल्हासनगर महापालिकेच्या ७८ जागेसाठी सर्वात्रिक निवडणूक झाली. मात्र बहुमतासाठीची ४० या जादुई बहुमताची मॅजिक फिगर भाजप व शिंदेसेनेला गाठता आला नाही. येथे भाजपचे ३७ तर शिंदेसेनेचे ३६ नगरसेवक निवडून आले. भाजप बहुमतासाठी ३ तर शिंदेसेना ४ जागेने कमी आहे. मात्र उल्हासनगरमध्ये शिंदेंच्या सेनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळाला आहे. वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक आणि एका अपक्ष नगरसेविकेने शिंदेसेनेला पाठिंबा दिल्याने शिंदेसेनेचा बहुमताचा ४० हा आकडा पूर्ण झाला आहे. त्यांना सत्ता स्थापनासाठी साई पक्ष ०१, शिंदेसेना समर्थक अपक्ष१, वंचित बहुजन आघाडीचे ०२, अपक्ष- ०१ यांनी शिंदेसेनेला पाठिंबा जाहीर केला. तर काँग्रेस पक्षाचा १ नगरसेवक असून त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ३७ नगरसेवक असलेल्या भाजपला विरोधी बाकावर बसावे लागू शकते. परंतु भाजपनेही अद्याप हार मानलेली नसून पडद्यामागे राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेला अधिकृत पाठिंब्याचे दिले पत्र मागील दोन दिवस खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संपर्कात असलेल्या वंचितच्या नगरसेविका सुरेखा सोनावणे आणि विकास खरात यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिवसेनेला अधिकृत पाठिंब्याचे पत्र दिले आहे. शिंदेसेनेने राजकीय कौशल्याने अपक्ष आणि वंचितच्या नगरसेवकांना आपल्या गोटात खेचण्यात यश मिळवले. अपक्ष नगरसेविका सविता तोरणे-रगडे यांनी ओमी कलानी आणि शिवाजी रगडे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेला साथ दिली. तसेच साई पक्षाच्या दीप्ती दुधानी यांनीही आपली भूमिका स्पष्ट करत शिंदेसेनेसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शिंदेसेनेचा आकडा आता ४० वर पोहोचला आहे. यामुळे आता वंचितला उपमहापौरपदासह महत्त्वाची पदे मिळण्याची शक्यता आहे. Maharashtra Politics | दरम्यान, या २९ महानगरपालिकांसाठी गुरुवार, २२ जानेवारी रोजी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे आता महापौर निवडीसंदर्भातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. Maharashtra Politics | हेही वाचा : ट्रम्पच्या इशाऱ्यानंतर नॉर्वेच्या पंतप्रधानांनी नोबेल पुरस्काराच्या जखमेची काढली खपली ; म्हणाले, “हा पुरस्कार…”