भवानीनगर -श्री छत्रपती स्वाभिमानी सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी तानाजी शिंदे तर उपाध्यक्षपदी सुमन आगलावे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कार्यकाल संपल्याने श्री छत्रपती हायस्कूल सभामंडपामध्ये ही निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी शिंदे व उपाध्यक्षपदासाठी आगलावे यांचे एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सहायक निबंधक जिजाबा गावडे व श्रीहरी काळे यांनी दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी पतसंस्थेचे संस्थापक भागवत घुले, अशोक देवकर, भगवान वायसे, संजय भोसले, गुणवंत वाघमोडे, रामचंद्र शिंगाडे, नीलिमा घुले, प्रकाश कोळेकर, हरिश्चंद्र करे, हरी काटे आदी मान्यवर उपस्थित होते.