शिल्पा शेट्टीच्या घरी यंदा गणपती बाप्पाचं आगमन नाही; पोस्ट शेअर करत सांगितलं कारण
Shilpa Shetty | गणरायाच्या आगमनासाठी जोरदार तयारी केली जात आहे. उद्या २७ ऑगस्ट रोजी बाप्पाचे आगमन होणार आहे. सिने इंडस्ट्रीतील अनेक कलाकरांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन होते.
यात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा देखील समावेश आहे. दरवर्षी शिल्पाच्या घरी वाजत गाजत बाप्पाचं आगमन होत असतं, पण यंदा मात्र तिच्या घरी बाप्पाचं आगमन होणार नाही. याबाबत स्वत: तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले आहे.
शिल्पा शेट्टीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये शिल्पा शेट्टीनं म्हटलं आहे की, “मित्रांनो, तुम्हाला कळविण्यास अतिशय दुःख होत आहे की, कुटुंबातील सदस्याच्या निधनामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा आम्ही गणेशोत्सव साजरा करणार नाही. परंपरेनुसार, आम्ही 13 दिवसांचं सुतक पाळत आहोत आणि म्हणून कोणतेही धार्मिक उत्सव घरात साजरे होणार नाहीत,” असे तिने म्हंटले आहे. Shilpa Shetty |

दरवर्षी शिल्पा शेट्टी एक -दोन दिवस आधीच ती गणपती बाप्पाची मूर्ती घरी घेऊन जाण्यासाठी येत असते. तिच्या घरी लालबागच्या राजाचा प्रतिकृती असलेली गणपतीची मूर्ती असते. शिल्पाच्या घरी दरवर्षी गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र यंदा तिच्या घरी सुतक असल्यानं घरात १३ दिवस कोणताही सण साजरा होणार नाही. त्यामुळे यंदा शिल्पाच्या घरी गणरायाचे आगमन होणार नाही. Shilpa Shetty |
हेही वाचा:





