चप्पल घालून शिल्पा शेट्टीने केले ध्वजारोहण; ट्रोल होताच दिले सडेतोड उत्तर

मुंबई – देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने देखील आपल्या कुटुंबासोबत स्वातंत्र दिन साजरा केला. तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात तिने ध्वजारोहण करताना चप्पल घातली होती. हे पाहून नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. मात्र यावर शिल्पा देखील शांत बसली नाही. तिने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.
शिल्पा शेट्टीने तिच्या इनस्टाग्राम अकाऊंटवर ध्वजारोहण करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात ती चप्पल घालून ध्वजारोहण करत असल्याचे दिसते. व्हिडिओमध्ये शिल्पा पती राज कुंद्रा, तिची आई आणि मुलगा विआन राष्ट्रध्वज फडकवताना दिसत आहे. यात घरातील सर्वच कुटूंबाने चप्पल घातल्याचे दिसते. मात्र यावरून नेटकऱ्यांनी तिला ‘चप्पल काढली असती तर बरे झाले असते…’ अशा कमेंट केल्या आहेत.
View this post on Instagram
मात्र शिल्पा शेट्टीने ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देत लिहिले की, ‘झेंडा फडकवतानाचे सर्व नियम मला माहित आहेत, माझ्या देशाचा आणि ध्वजाचा आदर माझ्या मनातून येतो, प्रश्न मांडण्यासाठी नाही. मी अभिमानास्पद भारतीय आहे. आजची पोस्ट त्या भावना शेअर करण्यासाठी होती. सर्व ट्रोलर्ससाठी ज्यांना मी सहसा दुर्लक्ष करते, मी या दिवशी दुर्लक्ष करू शकत नाही. त्यामुळे तुमचे तथ्य बरोबर करा.’
दरम्यान, शिल्पा शेट्टी लवकरच ‘केडी: द डेव्हिल’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे ती 18 वर्षांनंतर कन्नड चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार आहे.





