शिल्पा शेट्टी भावूक; ‘सुपर डान्सर चॅप्टर ५’मध्ये दिले सरप्राईज

Shilpa Shetty | अभिनेत्री शिल्पा शेट्टीने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहे. याशिवाय ती फिटनेससाठी देखील ओळखली जाते. नुकतेच तिच्या बॉलीवूडमधील प्रवासाला ३० वर्ष पूर्ण झाले आहेत. यानिमित्त तिला खास सरप्राईज देण्यात आले आहे.
‘सुपर डान्सर चॅप्टर ५’च्या आगामी भागात ‘मस्ती की पाठशाला’ या खास थीमसह शालेय आठवणींचा एक सुंदर प्रवास पाहायला मिळणार आहे. या विशेष भागात शिल्पा शेट्टीचा एक खास व्हिडिओ सादर केला जाणार आहे. यात शिल्पाच्या शालेय आयुष्याचे सुंदर क्षण दाखवले गेले आहेत.
View this post on Instagram
या क्लिपमध्ये तिच्या बालपणीच्या आठवणी, वर्गमित्र, शिक्षक आणि तिच्या शाळेच्या मुख्याध्यापिकाही सामील झाल्या आहेत. हा व्हिडिओ पाहताना शिल्पाला अश्रु अनावर झाले होते.
यावेळी शिल्पाने सांगितले की, “अजूनही विश्वास बसत नाही की मी इंडस्ट्रीमध्ये ३० वर्षं पूर्ण केली आहेत. मी कधीच कल्पना केली नव्हती की मी आयुष्यात इतकं काही मिळवू शकेन. जेव्हा लोक सांगतात की माझ्या प्रवासाने त्यांना प्रेरणा मिळाली. तेव्हा मी स्वतःला खूप भाग्यवान समजते.” तसेच शाळेचे दिवस खरंच आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस असल्याचे देखील तिने सांगितले.
हेही वाचा:





