मुंबई – फिटनेस फ्रिक असलेली अभिनेत्री ‘शिल्पा शेट्टी’ सध्या मोठ्या स्क्रिनपासून दूर असली तरी ती मोठं मोठ्या इव्हेंट्सला हजेरी लावताना दिसते.बॉलिवूडमधील फिटनेस प्रेमी अशी अभिनेत्री शिल्पा शेट्टीची ओळख आहे. तिच्याहून फिट अभिनेत्री कदाचितच बॉलिवूडमध्ये पाहायला मिळेल.चित्रपटांपासून शिल्पा दूर असली तरी कोणत्या इंडस्ट्रीमध्ये नेमकं काय सुरु आहे याची माहिती तिला असतेच. याचाच प्रत्यय तिने शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे आला.
एरवी जिममध्ये वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ आणि फोटो पसोट करणाऱ्या शिल्पा शेट्टीने यावेळी मात्र एका मराठी गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हे गाणं दुसरं तिसरं कोणतंही नसून सध्या रिल्सवर व्हायरल होत असलेलं ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटातील सुपरहिट गाणं ‘बहरला हा मधुमास नवा’ हे आहे.
बहरला हा मधुमास नवा या गाण्याची भुरळ महाराष्ट्र नाही,देश नाही तर विदेशातील लोकांना देखील पडल्याचे पाहायला मिळाले. अभिनेत्री शिल्पा शेट्टीने यावेळी सेम हुक स्टेप्स करत या गाण्यावर ठेका धरल्याचे पाहायला मिळाले. प्रक्षकांना देखील तिचा हा मराठमोळा साज चांगलाच आवडला आहे. चाहत्यांनी तिच्या या नृत्याचे चांगलेच कौतुक देखील केले आहे.
View this post on Instagram
कामाबाबत बोलायचे झाल्यास शिल्पा लवकरच रोहित शेट्टीसोबत भारतीय पोलिसांचा एक भाग बनताना दिसणार आहे. ‘इंडियन पोलीस फोर्स’ असं तिच्या आगामी चित्रपटाचं नाव असून, यामध्ये अभिनेत्री शिवाय सिद्धार्थ मल्होत्राही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.