शिक्रापुरात साध्या व पारंपारिक पद्धतीने बैलपोळा साजरा

Updated On:

शिक्रापूर-महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा आवडता सन मध्ये बैलपोळा आज बैलपोळा सन सर्वत्र साध्या व पारंपारिक पद्धतीने साजरा झाला असून कोरोनामुळे शासनाकडून अनेक नियम लावण्यात आलेले असल्याने शेतकऱ्यांना बैलांची मिरवणूक काढता न आल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून शिक्रापुर येथे देखील साध्या व पारंपारिक पद्धतीने बैलपोळा सन साजरा करण्यात आला आहे.


शिक्रापूर ता. शिरूर सह परिसरातील जातेगाव, तळेगाव ढमढेरे, सणसवाडी. केंदूर, करंदी, मुखई, धामारी यांसह आदी गावांमध्ये भाद्रपद अमावास्येला येणारा शेतकऱ्यांचा आवडता आणि महत्वाचा बैलपोळा सन साजरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आज सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्या लाडक्या बैलांसाठी उपवास करत बैलांना आंघोळ घालून सकाळ पासूनच सणामध्ये शेतकरी रमून गेले होते.

शेतकऱ्यांसोबत त्यांच्या घरातील लहान लहान बालचमूंनी देखील लहान लहान वासरांना आंघोळ घालत, रंगवून बैलपोळा सनाचा आनंद लुटला आहे, आज बैलांना आंघोळ घालून, बैलांना रंगवून बैलांची सजावट करून वेगवेगळ्या पद्धतीने बैलांना कलर लावून बैलांची सजावट करण्यात आली, यावेळी शेतकऱ्यांच्या येथे मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र नेहमी प्रमाणे बैलपोळा या दिवशी बैलांची सजावट केल्यानंतर बैलांची गावातून वाजत गाजत काढण्यात येणारी मिरवणूक शेतकऱ्यांना काढता आली नाही म्हणून शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

सायंकाळी बैलांना पुरणपोळ्यांचा नैवद्य देऊन बैलांची घराजवळील एखाद्या छोट्याशा मंदिरात घेऊन जात साध्या पद्धतीने पूजा करण्यात आली. तर याबाबत बोलताना सध्या शेतीच्या मशागतीसाठी विविध यंत्रांचा वापर केला जात आहे तसेच बैलगाडा शर्यती बंद असल्याने बैलांची संख्या कमी होत आहे परंतु शेतकऱ्यांच्या दारामध्ये असलेली बैले हीच शेतकऱ्यांची संपत्ती आणि दारामध्ये असलेली गाय हीच शेतकऱ्यांची लक्ष्मी असल्याचे गाडाशौकीन आमीर शेख, अक्षय साबळे, अर्शलान शेख यांनी सांगितले.

तर यावेळी बोलताना शेतकऱ्यांचा आवडता सण बैलपोळा या दिवशी बैलांच्या सणामुळे घरामध्ये आनंदाचे वातावरण असते परंतु वर्षभर आमची साथ देणाऱ्या बैलांची आज बैलपोळा सणाच्या दिवशी कोरोना मुळे मिरवणूक काढता आली नसल्याची खंत मनामध्ये असल्याचे शिक्रापूर येथील शेतकरी सिकंदर शेख यांनी सांगितले.

टॅग्स:

आणखी संबंधित बातम्या

Pune District : निमगाव म्हाळुंगीत दूषित पाण्याने हजारो मासे मृत

2026-09-23 08:17:13

Pune District : निमगाव म्हाळुंगीत दूषित पाण्याने हजारो मासे मृत

Shikrapur : जिल्हा बँकेच्या मतदान प्रतिनिधी ठरावावरून मारहाण

2026-09-09 08:02:19

Shikrapur : जिल्हा बँकेच्या मतदान प्रतिनिधी ठरावावरून मारहाण

Shikrapur News : दहीहंडी-गणेशोत्सवात आवाजाची स्पर्धा रंगवाल तर खैर नाही! शिक्रापूर पोलिसांचा थेट इशारा

2026-09-03 19:36:29

Shikrapur News : दहीहंडी-गणेशोत्सवात आवाजाची स्पर्धा रंगवाल तर खैर नाही! शिक्रापूर पोलिसांचा थेट इशारा

Shikrapur : फटाक्यासारखा कर्णकर्कश आवाज करणाऱ्या 22 वाहनांवर शिक्रापूर पोलिसांची कारवाई

2026-08-26 17:00:37

Shikrapur : फटाक्यासारखा कर्णकर्कश आवाज करणाऱ्या 22 वाहनांवर शिक्रापूर पोलिसांची कारवाई

Crime News: दहशत, खंडणी अन् खुनाचा प्रयत्न... शिक्रापूरातील सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध

2026-08-24 14:42:58

Crime News: दहशत, खंडणी अन् खुनाचा प्रयत्न... शिक्रापूरातील सराईत गुन्हेगार एक वर्षासाठी स्थानबद्ध