शेटफळ हवेली तलाव 30 टक्‍के भरला

माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते तलावातील पाण्याचे पूजन

रेडा – शेटफळ हवेली तलाव भरून घेण्यासाठी सध्या तलावात पाणी सोडण्यात येत आहे. मंगळवारी (दि. 17) तलावात 30 टक्के पाणीसाठा झालेला आहे. शेटफळ तलावाची पाणी साठवण क्षमता 620 द.ल.घ. फूट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदामंत्री डॉ. गिरीश महाजन हे इंदापूर तालुक्‍यातील पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी सहकार्य करीत आहेत. त्यामुळे आगामी काळात तालुक्‍यातील पाणी प्रश्‍न मार्गी लागून शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे, असे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

इंदापूर तालुक्‍यातील शेटफळ हवेली तलावातील पाण्याचे पूजन राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. या प्रसंगी नीरा भीमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, प्रशांत पाटील, नानासाहेब शेंडे, उदयसिंह पाटील, विलासराव वाघमोडे, कांतीलाल झगडे, विकास पाटील, मनोज पाटील, महादेव घाडगे, पंडितराव पाटील, शिवाजीराव हांगे, सतीश अनपट, शाखा अभियंता एम. बी. शिंदे समवेत पदाधिकारी, शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले तर सुयोग शिंदे यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.