युसूफ पठाणला ठोकले सलग 5 षटकार ! RCB ने टीमबाहेर काढलेल्या ‘या’ खेळाडूने गाजवले मैदान

नवी दिल्ली – क्रिकेटच्या T20 फॉरमॅटमध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. फास्ट क्रिकेटच्या या अदभूत खेळात कधी कधी एखादा बॉलरही तुफान खेळी करून जातो. तर कधी एखादा फॉर्मात नसलेला बॅट्समन देखील चांगली खेळी करतो. असाच काहीसा प्रकार सध्या सुरु असलेल्या T20 इंटरनॅशल लीगमध्ये पाहायला मिळाला आहे. अमिरातीमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेमध्ये एका विडीज खेळाडूने युसूफ पठाणला एका ओव्हरमध्ये पाच सिक्स ठोकत मैदानात रन्सचा पाऊस पाडला.
गुरुवारी सुरु असलेल्या एका सामन्यमध्ये शेरफेन रदरफोर्डने आक्रमक बॅटिंग केली. डेजर्ट वायपर्सकडून खेळताना त्याने एका ओव्हरमध्ये युसूफ पठाणला चौफेर फटकेबाजी करत बॅक टू बॅक असे पाच सिक्स लगावले. युसूफ पठाणच्या ओव्हरदरम्यान दुसऱ्या चेंडूवेळी रदरफोर्ड स्ट्राईकवर आला अन्यथा त्याने सहा सिक्स ठोकत युवराज सिंहच्या रेकॉर्ड सोबत बरोबरी केली होती. रदरफोर्ड हा मूळचा वेस्ट इंडिज टीमचा खेळाडू आहे.
6⃣ 6⃣ 6⃣ 6⃣ 6⃣ 🤯
Watch when @sherfaneruther1 went berserk and smashed Yusuf Pathan for 5⃣ #Bawaal maximums in an over! 👏 #DVvDC #CricketOnZee #DPWorldILT20
#HarBallBawaal #Rutherford https://t.co/3vNKqQ3GnM pic.twitter.com/hhxGWoG0FX— Zee Cricket (@ilt20onzee) February 2, 2023
रदरफोर्डच्या या बॅटिंगचे नेटकऱ्यांकडून चांगलच कौतुक होतंय. या आतिषबाजीमुळे रदरफोर्ड 20 बाल्समध्ये 46 धावांवर पोहचला. त्यानंतर आपला अर्धशतक पूर्ण करत तो तंबूत परतला. 2022 च्या आयपीएलमध्ये रदरफोर्ड रॉयल चॅलेंजर्सकडून खेळला होता. परंतु नंतर आरसीबीने त्याला रिटेन केले होते.





