पिंपरी | शिलाटणे येथे वादळामुळे घरांचे पत्रे उडाले

कार्ला, (वार्ताहर) – मावळ तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वा-यासह अवकाळी पावसाचे आगमन होत असून या पावसामुळे अनेकांना याचा फटका बसत आहे. मंगळवारी (दि. १४) दुपारी झालेल्या वादळामुळे शिलाटणे गावातील अनेकांच्या घराचे पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले. तसेच कार्ला गावातील अनेक झाडांच्या फांद्या तुटल्याने अक्षय पवार यांंच्या चारचाकी वाहनावर फांदी पडल्याने नुकसान झाले आहे.
शिलाटणे गावाखालील पडाळीवर बाबाजी धोंडिबा भानुसघरे, निवृती कोंडिराम भानुसघरे, शांताराम कोंडिराम भानुसघरे या ग्रामस्थांच्या घरांचे व दुकनाचे पत्रे फुटले. तर, काहींच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. वादळामुळे गावातील अनेक झाडांच्या फांद्या तुटल्याने नुकसान झाले आहे.
तसेच वादळामुळे विजवाहक तारा तुटल्या व खांबाचे देखील नुकसान झाले. विजवाहक तारा तुटल्याने काही भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. परंतु, तत्परतेने महावितरणच्या कर्मचा-यांनी वीजपुरवठा सुरळीत केला. अचानक आलेले वादळ व पावसाने ज्यांचे नुकसान झाले आहे,
त्याचा पंचनामा करुन नुकसानभरपाई मिळावी यासाठी नुकसानग्रस्त ग्रामस्थ मागणी करत आहे. तर, कार्ला गावातील अनेक झाडांच्या फांद्या तुटल्याने अक्षय पवार यांंच्या चारचाकी वाहनावर फांदी पडल्याने नुकसान झाले आहे.





