‘यालाच म्हणतात, अकलेचे कांदे… शीतल म्हात्रे यांची प्रियंका चतुर्वेदींवर टीका

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर जोरदार निशाण साधला आहे. शीतल म्हात्रे यांनी ट्विट करत प्रियंका चतुर्वेदींवर टीका केली आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेल्या एका आंदोलनाचा फोटो ट्विट करून त्यांनी ही टीका केली आहे. शीतल म्हात्रे यांच्याकडून सातत्याने ठाकरे गटावर निशाणा साधला जातो. शीतल म्हात्रे X च्या माध्यमातून सातत्याने ठाकरे गटाच्या टीकेला प्रत्युत्तर देत असतात.
चतुरताईंच्या अकलेचं दार कधी उघडणार…
यालाच म्हणतात… अकलेचे कांदे…चिऊसेनेच्या काऊताई… डायमंडचे कानातले… लुई व्हिटॉनची पर्स…आयफोन १५ हातात ठेवून "महागाई" बद्दल बोलत आहेत …
एकतर आंदोलनाचा आणि आपला सबंध नाही…आणि त्यात सुद्धा गरिबीची चेष्टा करत आहात… @priyankac19 pic.twitter.com/ThQ4Hwj2Mp— sheetal mhatre (@sheetalmhatre1) August 9, 2024
काय केले ट्विट?
“चतुरताईंच्या अकलेचं दार कधी उघडणार? यालाच म्हणतात, अकलेचे कांदे. चिऊसेनेच्या काऊताई. डायमंडचे कानातले. लुई व्हिटॉनची पर्स. आयफोन 15 हातात ठेवून महागाईबद्दल बोलत आहेत. एकतर आंदोलनाचा आणि आपला सबंध नाही आणि त्यात सुद्धा गरिबीची चेष्टा करत आहात”, अशी टीका शीतल म्हात्रे यांनी प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर केली.
उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा
शितल म्हात्रे यांनी आणखी एक ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी एका वेब पोर्टलच्या बातमीचा दाखला देत निशाणा साधला. द्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांचे पाय धुवावे, अशा स्वरुपाच्या बातमीचा स्क्रिनशॉट शेअर करून त्यांनी निशाणा साधला आहे. “अरेरे… कशी नशिबानं थट्टा आज मांडली. आता काँग्रेस सोबत जुळवून घेतलचं आहे तर पाय धुणे, चपला उचलणे, भेटीसाठी ताटकळत थांबणे, हे सगळं शिकून घ्या उद्धटराव. नानांना वाटलं असेल, आता तुम्ही मुजरे घालायला दिल्लीला गेलाच आहात तर पाय धुवायला काय अडचण आहे? कारण आता तुमचा पाठीचा कणा वाकलाय की कणाच राहिला नाही?”, असा खोचक सवाल शीतल म्हात्रे यांनी केला.



