Ravi Kishan : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या आगामी ‘मा बहन’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रेक्षक या डार्क कॉमेडी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात माधुरी दिक्षितसोबत दोन महत्वाच्या कलाकरांच्या विशेष भूमिका आहेत. एक म्हणजे सध्याची आघाडीची अभिनेत्री तृप्ती डिमरी आणि दुसरा म्हणजे अभिनेता रवी किशन. या चित्रपटाच्या ट्रेलर लाॅन्च कार्यक्रमात अभिनेता रवि किशनने माधुरी दीक्षितचे भरभरून कौतुक केले. ( Ravi Kishan ) या कार्यक्रमात एका पत्रकाराने रवी किशनला “तुमचा ‘जिंदगी झंडवा फिर भी घमंडवा’ हा संवाद खूप प्रसिद्ध झाला आहे. आता अभिमान बाळगण्याची वेळ आली आहे, कारण माधुरीजी तुमच्यासोबत आहेत.” असा प्रश्न केला. Ravi Kishan : “ती महाराष्ट्रात वाढली, पण तरीही…”; रवि किशनकडून माधुरीचं भरभरून कौतुक या प्रश्नावर अभिनेत्याने त्याच्या नेहमीच्या खास शैलीत उत्तर देत माधुरी दीक्षितचे कौतुक केले.”तिच्यासोबत (माधुरी दीक्षित) काम करताना अभिमान विसरा, तुम्ही फक्त तिचे कौतुकच करू शकता. तिने कानपुरीया, भोजपुरी, गोरखपुरीया किंवा बनारसी भोजपुरी, म्हणजेच भोजपुरीचा आत्मा, ती इतक्या सुंदरपणे बोलली आहे, असे कौतुकाचे उद्गार काढले. (Ravi Kishan) तिने इतकी मेहनत आणि परिश्रम घेतले आहेत की ती महाराष्ट्रीयन आहे असे वाटतच नाही. ती महाराष्ट्रात वाढली, पण तरीही ती एक भोजपुरी मुलगी आहे असे वाटेल. म्हणून माधुरी मॅडम, तुम्ही माझा स्वाभिमान धुळीस मिळवला आहे. तुम्ही त्याचे अक्षरशः तुकडे तुकडे केले आहेत.’ अशी मिश्किल टिप्पनीही रवी किशन यांनी केली. ‘मा बहन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेश त्रिवेणी यांनी केले आहे. अभिनेत्री तृप्ती डिमरी देखील यात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सोशल मीडिया स्टार धारणा दुर्गा देखील या चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा चित्रपट ४ जून २०२६ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार असून, चाहते माधुरीला एका वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत. हेही वाचा : China Coal Mine Blast : कोळशाच्या खाणीत भीषण स्फोट, 82 कामगारांचा मृत्यू, अद्यापही काही जण अडकले