बिहारच्या जहानाबादमध्ये शरजील इमामला अटक

पटना : भडकाऊ भाषण दिल्याचा आरोप असलेले जेएनयूचा विद्यार्थी शर्जील इमाम याला अखेर पोलिसांनी अटक केली. मंगळवारी पोलिसांनी त्याला बिहारच्या जहानाबाद येथून अटक केली आहे.
पोलिसांनी सोमवारी जहानाबादमधील शारजिलच्या वडिलोपार्जित घरात छापा टाकला होता. यात त्याचे भाऊ मुजम्मिल इमाम यांना अटक करण्यात आली होती. सोमवारी दिल्ली पोलिसांनी शरिजील इमामच्या शोधात मुंबई, पाटणा, दिल्ली येथे छापा टाकले होते.
दरम्यान चार दिवसांपूर्वी शरजील इमामचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ते अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या (एएमयू) व्यासपीठावरून आसामला भारतापासून वेगळे करण्याची ते भाषा करीत आहे.
दरम्यान हि व्हिडीओ क्लिप एडिटेड असून न्यायालयात सत्य समोर येईल असे शरजीलने काल स्पष्ट केले होते. तर या व्हिडीओ क्लिपचे सत्यता पडताळणीची मागणी विद्यार्थी वर्गातून होत आहे.





