मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ‘स्वरा भास्कर’ आपल्या रोखठोक बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री सतत सोशल मीडियावर बेधडक वक्तव्य करत कधी कौतुक तर कधी टीकेला सामोरं जाते. अश्यातच अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आणि याच कारण देखील खास आहे.
नुकतंच अभिनेत्री स्वरा भास्कर हिने आपल्या बॉयफ्रेंड आणि राजकीय नेता असणाऱ्या फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज आणि साखरपुडा केला आहे. स्वतः स्वराने तिच्या कोर्ट मॅरेजचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. या दोघांचे धर्म वेगवेगळे आहेत. फहाद मुस्लीम तर स्वरा हिंदू आहे. मात्र, या दोघांची पहिली भेट शाहिनबागच्या आंदोलनात झाली होती.
दरम्यान, अभिनेत्रीने गुपचूप कोर्ट मॅरेज आणि साखरपुडा केल्यानंतर सर्वांचं धक्का बसला होता. त्यानंतर स्वराने मीडियासोबत संवाद साधताना “पिक्चर अभी बाकी है… ‘असं म्हणत चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. मात्र, नुकतंच अभिनेत्री आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून, या फोटो मुळे चर्चेला उधाण आलं आहे. लग्नानंतर काही दिवस अभिनेत्री सोशल मीडियापासून दूर होती.
पण स्वरानं मात्र तिच्या लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय. अनेक चित्रपट, मालिकांमध्ये लग्नानंतरची पहिली रात्र फिल्मी स्टाइलनं दाखवली जाते. दुधाचा ग्लास, फुलांनी सजवलेला बेड वगैरे. स्वरानं ही तिच्या पहिल्या रात्रीची फिल्मी स्टोरी शेअर केली आहे. हा फोटो शेअर करत तिनं कॅप्शन लिहिलं की. “माझी सुहागरात अगदी फिल्मी स्टाईलने होण्यासाठी आईनं याची चांगलीच तयारी करून घेतलीय…’ असं ती म्हणाली आहे.