व्होडाफोन आयडियाच्या शेअरची घसरण चालूच
Updated On:

मुंबई – व्होडाफोन आयडिया कंपनीवरील कर्जाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे कालपासून या कंपनीच्या शेअरची घसरण चालू आहे. बुधवारी या कंपनीचा शेअर 19 टक्क्यांनी कोसळला.
कंपनीची परिस्थिती खराब होत असतानाच व्होडाफोन आयडिया कंपनीचे बिगर कार्यकारी अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
कंपनीच्या संचालक मंडळाने बिर्ला यांचा राजीनामा स्वीकारला असून या जागेवर हिमांशू कपानिया यांची नियुक्ती केली आहे.
भारतातील दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे बऱ्याच कंपन्या नामशेष झाल्या आहेत. या क्षेत्राने केंद्र सरकारकडे अनेक वेळा मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र आतापर्यंत तरी केंद्र सरकारने या क्षेत्राला मदत करण्याचे कसलेही आश्वासन दिलेले नाही.





