Adani Group : अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर्स वधारले

मुंबई – अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील न्यायालयात अदानी समूहातील महत्त्वाच्या व्यक्तीवर भ्रष्टाचाराचे आरोप ठेवल्यानंतर या समूहातील कंपन्यांच्या शेअरवर होत असलेला परिणाम अल्पकाळ टिकला आहे. आता या शेअरची झालेली झीज वेगाने भरून निघत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
देशातील आणि परदेशातील बर्याच मानांकन संस्थांकडून आणि गुंतवणूदारांकडून समूहाला पाठिंबा वाढत असल्यामुळे गुंतवणूकदारांचाही या समूहाला पाठिंबा वाढत असल्याचे दिसून येते. या समूहातील 11 पैकी सात कंपन्यांच्या शेअरच्या भावात मंगळवारी वाढ झाली. अदानी पोर्ट कंपनीच्या शेअरचा भाव सहा टक्क्यांनी वाढला.
अंबुजा सिमेंट कंपनीचा शेअरचा भाव 5 टक्क्यानी, एसीसी कंपनीच्या शेअरचा भाव 2.56 टक्क्यांनी, अदानी एंटरप्राईजेस कंपनीच्या शेअरचा भाव 2.33 टक्क्यांनी, सांघी इंटरप्राईजेस कंपनीच्या शेअरचा भाव दोन टक्क्यांनी, अदानी विल्मर कंपनीच्या शेअरचा भाव 1.19 टक्क्यांनी वाढला. एनडीटीव्ही कंपनीच्या शेअरचा भाव 0.45 टक्क्यांनी वाढला. असे असले तरी अदानी ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरचा भाव एक टक्क्याने.
अदानी पावर कंपनीचे शेअरचा भाव 0.87 टक्क्यांनी, आदानी टोटल गॅस कंपनीच्या शेअरचा भाव 0.83 टक्क्यांनी तर आदानी एनर्जी सोल्युशन कंपनीच्या शेअरचा भाव 0.60 टक्क्यांनी वाढला. शेअर बाजारात गेल्या तीन दिवसापासून सकारात्मक वातावरण आहे.
त्याचा लाभ अदानी समूहातील कंपन्यांना होत असल्याचे ब्रोकर्सनी सांगितले. सौदी, जपान आणि इतर काही देशांनी अदानी यांच्या बाजूने ठामपणे उभा राहायचे ठरविले आहे. अमेरिकेतील वित्तीय संशोधन करणार्या ब्रेनस्टेन या कंपनीने अदानी समूहाची आर्थिक परिस्थिती बळकट असल्याचा अहवाल जारी केला.





