Share Market : चालू आठवड्यात विविध कंपन्यांनी जाहीर केलेले नवीन करार, व्यवस्थापनातील बदल आणि गुंतवणुकीचे (Share Market) मोठे निर्णय यांमुळे या समभागांमध्ये मोठी हालचाल पाहायला मिळू शकते. व्यवसाय विस्ताराच्या आघाडीवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडला प्रसार भारती आणि ईस्ट कोस्ट रेल्वेकडून एकूण 184 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. सेगल इंडियाच्या उपकंपनीला (Share Market) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून 603 कोटी रुपयांचे मोठे कंत्राट प्राप्त झाले आहे. विक्रम सोलरने समीर नागपाल यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सुला विनयार्डस्ने राजीव सामंत यांची पुढील तीन वर्षांसाठी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून फेरनियुक्ती केली असून केमप्लास्ट सनमारने ए. आर. बालाजी यांची नवीन मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून निवड केली आहे. या बदलांबाबत गुंतवणूकदारांचा या कंपन्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा राहतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. गुंतवणूक आणि नवीन प्रकल्पांच्या बाबतीत अशोक लेलँडफने आपल्या ब्रिटनमधील उपकंपनीमध्ये 375 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे. Share Market देवयानी इंटरनॅशनलने रेस्टॉरंटस् डेव्हलपमेंटमध्ये 347.3 कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली असून मॅक्स इस्टेटने नोएडामध्ये 3,000 कोटी रुपयांचा भव्य निवासी प्रकल्प सुरू केला आहे. याशिवाय महिंद्रा हॉलिडेजने महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात दोन नवीन रिसॉर्टस् सुरू करून आपल्या विस्ताराचा वेग वाढवला आहे. टाटा स्टीलने लुधियाना येथे 3,200 कोटी रुपयांचा अत्याधुनिक प्लांट सुरू केला असून टाटा मोटर्सने 1 एप्रिलपासून प्रवासी वाहनांच्या किमतीत सरासरी 0.5 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. इन्फोसिसने एआय-आधारित रेस सेंटरसाठी जागतिक भागीदारी केली आहे, तर एरिस लाइफसायन्सेसने मधुमेह आणि वजन कमी करण्यासाठीच्या सेमाग्लुटाइड औषधासाठी नेटको फार्मासोबत हातमिळवणी केली आहे. दुसरीकडे स्टेट बँक ऑफ इंडियाफला 6,338 कोटी रुपयांची टॅक्स डिमांड नोटीस मिळाली असली, तरी बँक याविरोधात कायदेशीर अपील करणार आहे. सोमवारी बाजार उघडताना या सर्व बातम्यांचा संबंधित कंपन्यांच्या शेअर्सवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सरलेला आठवडा अस्थिरतेचा सरलेल्या आठवड्यात शेअर बाजार (Share Market) निर्देशांकात बरीच अस्थिरता होती. खनिज तेलाचे दर कमी -जास्त होत असताना शेअर बाजाराचे निर्देशांकही कमी -जास्त होत होते. आठवड्याच्या पातळीवर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 0.2% कमी होऊन 23,114 अंकावर बंद झाला. बुधवारी निर्देशांक तीन टक्क्यांनी कोसळला होता. मात्र शुक्रवारी निर्देशांकात अर्धा टक्क्यापर्यंत वाढ होण्यास मदत झाली. आता आखाती युद्ध कशा प्रकारचे वळण घेते याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. अमेरिकेने इराणला एक महिना खनिज तेल इतर देशांना विकण्यास परवानगी दिली आहे. या प्रस्तावाला इराण कसा प्रतिसाद देतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जागतिक पातळीवर महागाई वाढण्याचा दबाव अमेरिकेवर येत असल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प युद्ध गुंडाळण्याची भाषा सुचित करीत आहेत. मात्र युद्धात कोणाच्याही वक्तव्यावर प्रथम दर्शनी विश्वास ठेवता येत नाही. त्यामुळे या सर्वच बाबीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागलेले आहे. युध्द थांबण्याची शक्यता वाढल्यानंतर सर्वच देशातील शेअर बाजारात तेजी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.