Share Market: भारतीय शेअर बाजारात गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी तेजी कायम राहिली. प्रमुख बेंचमार्क निर्देशांक हिरव्या निशाणीवर बंद झाले. सकाळच्या सत्रात सेन्सेक्सने ८६,०५५ या आपल्या सर्वोच्च पातळीला (All-Time High) स्पर्श केला, मात्र दिवसअखेर या तेजीला ब्रेक लागला आणि बाजारात काही प्रमाणात करेक्शन (Correction) दिसून आले. बाजार बंद होताना सेन्सेक्स १११ अंकांच्या (०.१३%) वाढीसह ८५,७२० च्या पातळीवर स्थिरावला. तर निफ्टी ५० मध्ये ०.०३ टक्क्यांची २६ अंक माफक वाढ नोंदवत तो २६,२१५ च्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्सने ८५,७४५ तर निफ्टीने २६,२६१ वर ओपनिंग दिली होती. मिडकॅप आणि स्मॉलकॅप सुस्त – बेंचमार्क इंडेक्सच्या तुलनेत मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्सची कामगिरी निराशाजनक राहिली. बीएसई मिडकॅप (BSE Midcap) फ्लॅट (Flat) स्तरावर बंद झाला, तर बीएसई स्मॉलकॅपमध्ये (BSE Smallcap) ०.३८ टक्क्यांची घसरण दिसून आली. निफ्टी ५० मधील टॉप गेनर्स आणि टॉप लूजर्स – टॉप गेनर्स (Top Gainers) वाढ (टक्के) टॉप लूजर्स (Top Losers) घसरण (टक्के) बजाज फायनान्स २.२९% आयशर मोटर्स (Eicher Motors) २.७८% श्रीराम फायनान्स १.२९% अदानी एंटरप्रायझेस (Adani Enterprises) २.६०% आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) १.२६% मारुती सुझुकी (Maruti Suzuki) १.५७% हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) १.१०% बजाज ऑटो (Bajaj Auto) १.५५% बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserv) ०.८७% ओएनजीसी (ONGC) १.५०% सेक्टोरल इंडेक्सची स्थिती – गुरुवारी काही सेक्टर्समध्ये मोठी खरेदी तर काहींमध्ये विक्रीचा दबाव दिसून आला. निफ्टी मीडिया (०.८४%) आणि निफ्टी कॅपिटल सर्विसेस (०.५७%) हे सर्वाधिक तेजीत असलेले सेक्टर्स ठरले. तर निफ्टी ऑईल अँड गॅस (०.८४%) आणि निफ्टी रिअल्टी (०.७२%) मध्ये सर्वाधिक घसरण झाली. तेजी असलेले सेक्टर्स (हिरव्या निशाणीवर) वाढ (टक्के) घसरण असलेले सेक्टर्स (लाल निशाणीवर) घसरण (टक्के) निफ्टी मीडिया ०.८४% निफ्टी ऑईल अँड गॅस ०.८४% निफ्टी कॅपिटल सर्विसेस ०.५७% निफ्टी रिअल्टी ०.७२% निफ्टी फायनान्शियल सर्विसेस ०.५३% निफ्टी एनर्जी / निफ्टी एनर्जी बँक ०.५८% निफ्टी बँक ०.३५% निफ्टी इंडिया कन्झ्युमर ०.३८% निफ्टी प्रायव्हेट बँक ०.३४% निफ्टी ऑटो ०.३३%