Stock Market: शेअर मार्केटमध्ये महिला गुंतवणूकदारांची संख्या 2 कोटींपेक्षा जास्त

Stock Market: सध्या देशात सुमारे 8.5 कोटी गुंतवणूकदार आहेत. त्यापैकी 2 कोटींहून अधिक महिला गुंतवणूकदार आहेत. तसेच 5 कोटींहून अधिक कुटुंबे शेअर बाजारात थेट गुंतवणूक करतात. दरम्यान, देशातील एक तृतीयांश संपत्ती सध्या शेअर बाजारातून निर्माण होत आहे. देशाला पुढे नेण्यात शेअर बाजार खूप महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी भारत 4 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होईल, असा अंदाज अनेक अधिकारी आणि मंत्र्यांनी व्यक्त केला आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे मार्केट कॅप 2023 च्या अखेरीस $4.34 ट्रिलियन आहे. UBS च्या अहवालानुसार 2022 मध्ये भारताची संपत्ती 15.4 ट्रिलियन डॉलर होती.
डिसेंबरमध्ये उघडली विक्रमी 41.7 लाख डिमॅट खाती –
शेअर बाजारातील तेजीच्या काळात डिसेंबरमध्ये विक्रमी 41.78 लाख डिमॅट खाती उघडण्यात आली. नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी डेटानुसार, नोव्हेंबरमध्ये 27.81 लाख खाती उघडण्यात आली. एकूण डिमॅट खात्यांची संख्या 13.93 कोटी पार झाली आहे. ही जागतिक स्तरावरील आकडेवारी आहे.
भारतातील भांडवली बाजार गुंतवणूकदारांसाठी प्रचंड संपत्ती निर्माण करत आहेत. शेअर बाजारावरील लोकांचा विश्वास दृढ झाला आहे. त्यामुळेच देशातील गुंतवणूकदारांची संख्या साडेआठ कोटींवर पोहोचली आहे. याशिवाय 2 कोटींहून अधिक महिलाही आपले भांडवल शेअर बाजारात गुंतवत आहेत. देशातील 5 कोटींहून अधिक कुटुंबे शेअर बाजारातून गुंतवणूक करत आहेत. हा आकडा भारतातील एकूण कुटुंबांपैकी 17 टक्के आहे, अशी माहिती एनएसई चे एमडी आणि सीईओ आशीष कुमार चौहान यांनी दिली.





