Share Market Closing 16 Oct : सेन्सेक्स 318 अंकांनी घसरला, निफ्टी 25000च्या खाली

Share Market Closing 16 Oct : देशांतर्गत शेअर बाजारात घसरण सुरु आहे. सलग दुसऱ्या दिवशी प्रमुख बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी लाल रंगात बंद झाले. बुधवारी, 30 शेअर्सचा BSE सेन्सेक्स 318.76 (0.38%) घसरून 81,501.36 वर बंद झाला. दुसरीकडे, 50 शेअर्सचा विस्तृत निर्देशांक NSE निफ्टी 86.05 (0.34%) अंकांनी घसरून 25000 च्या खाली 24,971.30 वर बंद झाला.
परदेशी भांडवल काढणे आणि जागतिक बाजारातील कमकुवत ट्रेंड दरम्यान आयटी आणि ऑटो शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे बुधवारी देशांतर्गत शेअर बाजाराचा निर्देशांक पुन्हा घसरला आणि बीएसई सेन्सेक्स 318.76 अंकांनी किंवा 0.39 टक्क्यांनी घसरून 81,501.36 वर बंद झाला. व्यवहारादरम्यान तो 461.86 अंकांनी किंवा 0.56 टक्क्यांनी घसरून 81,358.26 अंकांवर आला. NSE निफ्टी 86.05 अंकांनी किंवा 0.34 टक्क्यांनी घसरून 24,971.30 वर बंद झाला.
सेन्सेक्स कंपन्यांची स्थिती –
सेन्सेक्समधील 30 कंपन्यांमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा, इन्फोसिस, कोटक महिंद्रा बँक, जेएसडब्ल्यू स्टील, अदानी पोर्ट्स, टाटा मोटर्स, अदानी पोर्ट्स, आयटीसी आणि टायटन या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. तर एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट्स आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली.
डॉलरच्या तुलनेत रुपया चार पैशांनी मजबूत –
जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड 0.08 टक्क्यांनी वाढून $74.32 प्रति बॅरलवर पोहोचले. बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 4 पैशांनी वाढून 84.00 (तात्पुरता) वर बंद झाला. मंगळवारी बीएसई सेन्सेक्स 152.93 अंकांनी किंवा 0.19 टक्क्यांनी घसरून 81,820.12 वर बंद झाला होता. निफ्टी 70.60 अंकांनी किंवा 0.28 टक्क्यांनी घसरून 25,057.35 वर बंद झाला होता.




