Gopichand Padalkar : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची पुन्हा एकदा टीका करताना जीभ घसरली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांच्यावर खालच्या शब्दांत टीका केली आहे. तसेच त्यांनी जयंत पाटील यांच्या वडिलांचा एकेरी उल्लेख केला आहे. त्यांनी पातळी सोडून टीका केल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यांच्या टीकेला जोरदार प्रत्युतर दिलं आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे खासदार डॅा. अमोल कोल्हे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं असून या पत्रातून त्यांनी गोपीचंद पडळकरांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदविला आहे. सुसंस्कृत राजकारणाचा वारसा अशा वक्तव्यांनी दिवसागणिक धूळिस मिळत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच पडळकरांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत “तुमचा पगार किती, तुम्ही बोलताय किती?”या धर्तीवर या वाचाळवीरांना सांगावेसे वाटते “आपली पात्रता काय.. आपण बोलतोय काय?” अला खोचक निशाणा डॅा. अमोल कोल्हे यांनी आमदार गोपीचंद पडळकरांवर साधला आहे. प्रशांत जगताप यांचा थेट आरोप तसेच पुण्याचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनीही पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत महाराष्ट्राची राजकीय आणि सामाजिक संस्कृती बिघडवण्याचं महापाप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असल्याचा थेट आरोप आमचा असल्याचं म्हटलं आहे. तर गोपीचंद पडळकर हा फक्त एक मोहरा आहे. हा देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात आणलेलं एक पाप आणि साप आहे, असं प्रशांत जगताप म्हणाले आहेत. सन्माननीय मुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis, विचार करा… आपण केवळ एका पक्षाचे नाहीत, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. आपण महाराष्ट्राच्या संस्कृतीचं रक्षण करणार? की पक्षातील वाचाळवीरांचं रक्षण करणार ? महाराष्ट्र आपल्या निर्णयाची वाट बघतोय !@NCPspeaks @Jayant_R_Patil pic.twitter.com/6Yac2aflAJ — Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) September 19, 2025 डॅा. अमोल कोल्हेंच पत्र माननीय देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य जय शिवराय ! माकडाच्या हाती कोलीत दिले आणि ते बोंबलत आग लावत सुटले तर दोष माकडापेक्षा कोलीत देणा-याचा जास्त असतो, असे म्हणतात.. सुसंस्कृत राजकारणाचा वारसा सांगणा-या महाराष्ट्रात दिवसागणिक आपल्या वक्तव्यांनी नीचतम पातळी गाठण्याची अहमहिका काही वाचाळवीरांमध्ये लागलेली दिसून येते.. दुर्दैवाने सत्तेच्या वळचणीला असू तर काहीही खपू शकते हा समज दृढ झाला तर येणारा भविष्यकाळ कधीही माफ करणार नाही.. राज्याचे प्रमुख या नात्याने आणि एक सुसंस्कृत राजकीय व्यक्ती म्हणून आपल्याकडून अपेक्षा आहेत.. त्या धुळीस मिळू नयेत ही देखील अपेक्षा.. या वाचाळवीरांच्या बेताल बडबडी ऐकून एका प्रसिध्द नाटकातील संवाद आठवतो – “तुमचा पगार किती, तुम्ही बोलताय किती?” या धर्तीवर या वाचाळवीरांना सांगावेसे वाटते – “आपली पात्रता काय.. आपण बोलतोय काय?” डॉ. अमोल रामसिंग कोल्हे (खासदार, शिरूर लोकसभा) असं पत्रात त्यांनी म्हटलं आहे. गोपीचंद पडळकरांची खालच्या शब्दांत टीका माणसं पाठवली. कशासाठी? गोपीचंद पडळकरने कुठल्या व्यापाऱ्याकडून पैसे घेतले का? घ्या एखादा मधला व्यापारी घ्या आणि त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करा. अरे जयंत पाटला तुझ्या सारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात कार्यक्रम करायची ती धमक आहे. तुझ्यासारखी ती अवलाद नाही. एवढ्या खालच्या लेव्हलला? आता माझा दांडीयाचा कार्यक्रम आहे. ये बघायला. तुझे डोळे दिपून जातील कार्यक्रम बघून, असं म्हणत आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख केला आहे. याशिवाय जयंत पाटील यांच्या वडिलांचा उल्लेख करत जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औवलाद वाटत नाही, काही तरी गडबड आहे का? अशी अत्यंत खालच्या शब्दांत टीका पडळकरांनी केली आहे. यामुळे आता ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. हेही वाचा : Jolly LLB 3: ‘जॉली एलएलबी ३’ प्रदर्शित; अक्षय कुमार–अर्शद वारसीच्या जोडीला प्रेक्षकांची दाद