Sharad Pawar : गेल्या काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॅाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. आता पुन्हा एकदा शरद पवार यांची प्रकृती बिघडली असून, त्यांना पुण्यातील रुबी हॅाल रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवारांवर उपचार करून त्यांना डॅाक्टरांच्या सल्ल्याने घरी सोडण्यात आले होते. पाच दिवस त्यांच्यावर रुबी हॅाल रुग्णालयात एका खाजगी रुममध्ये उपचार सुरू होते. त्यांना श्वसनासंबधी त्रास होत असल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता प्राथमिक माहितीनुसार, शरद पवार यांना काहीसा अशक्तपणा जाणवत आहे. त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांना अशक्तपणा जाणवत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे रुबी हॅाल रुग्णालयात त्यांना सलाईन लावली जाईल, अशी माहिती आहे. Sharad Pawar We are admitting Baba to Ruby Hall, Pune for follow-up tests and hydration. Thanking all the doctors and healthcare workers. — Supriya Sule (@supriya_sule) February 22, 2026 शरद पवारांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी पोस्टद्वारे सांगितले आहे. पोस्टमध्ये सुळेंनी शरद पवारांच्या काही टेस्ट करायच्या असल्याची महत्वाची माहिती दिली आहे. तसेच त्यांनी डॅाक्टर आणि हेल्थवर्कर्सचे आभार मानले आहेत. हेही वाचा : Supriya Sule post : शरद पवार राज्यसभेतून निवृत्त होणार; लेकीच्या सोशल मीडिया पोस्टने वेधले लक्ष, ‘तो’ जुना फोटो शेअर करत सुप्रिया सुळे म्हणाल्या…