प्रचाराच्या रणधुमाळीत तब्येतीला जपा ; आजारी रोहित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. खुद्द रोहित पवार यांनीच याविषयीची माहिती आपल्या फेसबुक पोस्ट द्वारे दिली आहे.

कोणतीही गोष्ट अंगावर काढली की ती, वाढत जाते आणि हॉस्पीटलचे दौरे करावे लागतात. तब्येतीकडे लक्ष न दिल्यामुळे गेले तीन दिवस नोबेल हॉस्पिटल मध्ये भरती व्हावं लागले असल्याचे खुद्द रोहित पवार यांनीच या पोस्ट मध्ये सांगितले आहे.

तसेच पुढे पोस्ट मध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती करत, आपण दिवसरात्र पक्षाच्या प्रचारासाठी सक्रीय राहत आहात त्यामुळे वाढत्या उन्हाची तमा न बाळगता प्रचार करत आहात, पण आपण देखील तब्येतीची काळजी घ्या. आपल्या सर्वांच्या कष्टामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांचा विजय होणार हे निश्चित आहे. फक्त त्याचसोबत आपली तब्येत तितकीच जपणं गरजेचं असल्याचे रोहित पवार यांनी या पोस्ट मध्ये लिहिले आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.