शरद पवार यांची मुंबईत पुन्हा साक्ष नोंदवणार
Updated On:

पुणे- ज्येष्ठ नेते शरद पवार यांची महत्त्वपूर्ण साक्ष कोरेगाव भीमा चौकशी आयोग प्रत्यक्ष नोंदवणार आहे. मुंबई येथील मलबार येथे सह्याद्री शासकीय अतिथीगृह येथे येत्या 5 मे रोजी साक्ष नोंदवण्यासाठी प्रत्यक्ष येणार आहेत, अशी माहिती चौकशी आयोगाचे सचिव व्ही. पळणीटकर यांनी दिली.
मुंबईतील सह्याद्री शासकीय अतिथीगृह येथे सकाळी 11 ते सायंकाळी 5 यादरम्यान चौकशी आयोग सुनावणी घेणार आहे. कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2018 रोजी घडलेल्या हिंसाचाराबाबत खासदार शरद पवार यांनी काही वक्तव्ये केली होती. त्या अनुषंगाने पवार यांची सुनावणीत पुरावे तसेच साक्ष नोंदविण्यात येणार आहे. तसेच चौकशी आयोग उलटतपासणी घेणार असल्याचे सचिव पळणीटकर यांनी सांगितले.





