सातारा – ज्याला विधानसभेला, लोकसभेला लोकांनी मोठ्या मतांनी नाकारला त्याची दखल घेण्याची आवश्यकता नाही असा टोला शरद पवार यांनी गोपीचंद पडळकरांचे नाव न घेता लगावता. शरद पवार सातार्यातील विश्रामगृहात माध्यमांशी बोलत होते.
भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसापूर्वी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना अशी टिका केली होती. त्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्या विरोधात आंदोलनाची भूमिका घेतली होती. मात्र, स्वत: शरद पवार अथवा त्यांच्या खास तत्त्वातून त्याबाबतीत कोणीही भूमिका जाहीर केली होती.
त्यामुळे शरद पवारांच्या सातारा दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. शरद पवार तरी सातार्यात याबाबतीत बोलतील असं वाटत असताना शरद पवारांनी ज्याला लोकांनी नाकारला त्याची मी काय दखल घ्यावी असे म्हणून गोपीचंद पडळकर यांना आपण खिजगणतीत धरत नसल्याचे दाखवून दिले आहे.