Sharad Pawar | B. Sudershan Reddy – विरोधी पक्षाने बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्याचा एकमताने निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षाची सर्व मते रेड्डींना जातील. त्यांना त्यांची ताकद माहित आहे. सत्ताधारी एनडीए आघाडीची संख्या जरी जास्त असली तरी आम्हाला काळजी नसून निकाल वेगळा लागेल, असा विश्वास शरद पवार यांनी उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपराष्ट्रपदीपदाच्या निवडणुकीवर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आल्याचीही माहिती दिली. शरद पवार म्हणाले, सत्ताधारी पक्षाने त्यांचा उमेदवार जाहीर केला होता. त्यानंतर, आम्ही सर्वांनी मिळून दोन ते तीन नावाची चर्चा केली, त्यानुसार सर्वांचे एकमत झाले. जे उमेदवार सत्ताधारी पक्षांने दिले आहेत, त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन केला. एनडीएचे उमेदवार सी. राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत, म्हणून सहकार्य करावे अशी विनंतीही त्यांनी केली होती. मात्र, मी त्यांना ते आमच्या विचारसरणीचे नसल्याचे सांगत शक्य नाही म्हटले, कारण ते वेगळ्या विचाराचे आहेत. झारखंडचे माजी मुख्यमंत्री सोरेन यांच्या अटकेचा त्यांनी दाखलाही दिला. सोरेन हे राज्यपाल यांना भेटायला गेले असता एजन्सीने त्यांना अटक केली. त्यावेळी, हे राजभवन आहे मला बाहेर अटक करा, असे सोरन सांगत होते. असे हे उमेदवार, ज्यांच्या राज्यभवनात मुख्यमंत्र्यांना अटक होते, सत्तेचाही दुरुपयोग आहे असे म्हणत एनडीए आघाडीच्या उमेदवारांवरही शरद पवारांनी टीका केली. निवडणूक आयोग स्वच्छ भूमिका घेत नाही निवडणूक आयोग स्वच्छ भूमिका घेत नाही, निवडणूक आयोग स्वतंत्र आहे. मात्र, त्यांनी त्यांची जी भूमिका घ्यायला हवी होती ती घेतली नाही असे म्हणत निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवरही शरद पवारांनी प्रश्न उपस्थित केला आहे. निवडणूक आयोगाकडून आमची फार काही अपेक्षा नाही, राहुल गांधींनी हे सर्व सत्य समोर आणले० मात्र याची सुरूवात बिहारमधून झाली. राहुल गांधी यांच्या माहितीत एका झोपडपट्टीत एका घरात १४० लोकं राहत आहेत, असेही पवारांनी यावेळी सांगितले.