Sharad Pawar : बारामती पोटनिवडणूकीसाठी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सुनेत्रा पवार यांनी स्वतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना दोनदा फोन करून दिलेला उमेदवार मागे घेण्याची मागणी केली. इतकेच काय तर, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली आहे. या भेटीत रोहित पवारांनी काँग्रेसने उमेदवारी मागे घ्यावी, अशी विनंती केली आहे. यानंतर आता शरद पवारांनी देखील ही निवडणूक बिनविरोध करण्याचा सल्ला काँग्रेसला दिला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी काँग्रेसला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आणि ही निवडणूक बिनविरोध करण्याचा सल्ला दिला आहे. Sharad Pawar आता हा निर्णय काँगेसने घ्यायचा (Sharad Pawar) “काँगेसचे लढायचं ठरवलं आहे. तो राष्ट्रीय पक्ष आहे. आम्ही त्यांना सांगू शकत नाही. पण ही जागा रिक्त अपघातामुळे झाली. एक कर्तुत्वान प्रतिनिधी महाराष्ट्रातून गेला. मी काँग्रेसला सल्ला देईल की ही निवडणूक बिनविरोध करणं योग्य होईल. मात्र हा निर्णय काँगेसने घ्यायचा आहे,” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. दरम्यान, अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी निधन झाले. त्यानंतर बारामती मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. सुनेत्रा पवार या निवडणूक रिंगणात आहे. त्यांच्याविरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केला नाही तर उद्धव ठाकरे गटाने देखील निवडणुकीसाठी उमेदवार दिला नाही. Sharad Pawar rohit pawar सहा जणांचे उमेदवारी अर्ज माघारी पण काँग्रेसने येथे आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केली. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. आतापर्यंत 53 उमेदवार निवडणुकीच रिंगणात आहेत. यातील अनेक उमेदवार हे मतदारसंघाबाहेरील असल्याचे समजते. बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज 9 एप्रिल शेवटचा दिवस असून, आतापर्यंत सहा जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यानुसार 47 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी मिळाली. काँग्रेस निवडणूक लढवण्यावर ठाम आहे. मात्र राष्ट्रवादीकडूनही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस शरद पवारांचा सल्ला ऐकणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. Sharad Pawar हेही वाचा : Samay Raina : “…तरी तुमच्या मुलाला पायावर का उभं केलं नाही?” समय रैनाची अमिताभ बच्चन यांच्यावर टीका