Sharad Pawar resigns : राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण ? ही नावे चर्चेत

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या बाबतची माहिती स्वतः शरद पवार यांनी दिली आहे.लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांना यावेळी अश्रू अनावर झाले.
अशात अशीही चर्चा आहे कि आता कोण पदभार स्वीकारणार ? शरद पवार यांच्या या घोषणेनंतर आता राष्ट्रवादीचा पुढील अध्यक्ष कोण? यावर चर्चा रंगू लागल्या आहेत. अशात पक्षातील चार नेत्यांची नावे चर्चेत आली आहे.
अजित पवार
विरोधीपक्ष नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव देखील चर्चेत आहे. राष्ट्रवादीत त्यांना मानणार वर्ग मोठा आहे. अजित पवार हे भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. पण आता शरद पवार हे निवृत्त होत असल्याने त्यांचं नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे.
जयंत पाटील
जयंत पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातले मोठे नेते आहेत. जयंत राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील माजी मंत्री आहेत. राष्ट्रवादी पक्षात त्यांचं स्थान मोठं आहे.
सुप्रिया सुळे
सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठे नेत्या आहे. त्या बारामतीच्या विद्यमान खासदार आहे. सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ह्यांच्या कन्या असून गेले अनेक वर्षे त्या राजकारणात सक्रीय आहेत. त्यामुळे त्यांचं देखील नाव चर्चेत आहे.
प्रफुल्ल पटेल
राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल हे महाराष्ट्रामधील एक मोठे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आहेत. ते ४ वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. तर राज्यसभा सदस्य देखील राहिले आहेत. केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये त्यांनी अनेक पदे भुषवली आहेत. ते अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष देखील आहेत. त्यामुळे त्यांचं नाव राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे.





