शरद पवारांनी झेड प्लस सुरक्षा घेण्याची केंद्राची विनंती; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणानंतर केंद्रीय यंत्रणा सावध

Sharad Pawar | केंद्रीय यंत्रनेने खासदार शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्याबाबत निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर केंद्रीय यंत्रनेने राज्यातील आढावा घेतला. आता केंद्रीय यंत्रणा खासदार शरद पवार यांना सुरक्षा घेण्यासाठी संपर्क साधणार आहे. याआधीही केंद्राने खासदार शरद पवार यांना झेडप्लस सुरक्षा दिली होती, पण ती सुरक्षा पवार यांनी नाकारली होती.
आगामी विधानसभा निवडणूक आणि पदाचा विचार करता सुरक्षा घेण्यासाठी पवारांशी संपर्क साधला जाणार आहे. खासदार शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्याबाबत पुन्हा विनंती करण्यात येणार आहे. दोन महिन्यांपूर्वी झेड प्लस सुरक्षा देऊनही शरद पवार यांनी सुरक्षा घेतली नव्हती, त्यामुळे आता सीआरपीएफचे अधिकारी शरद पवार यांना भेटून याबाबतची माहिती देऊ शकतात. Sharad Pawar |
शरद पवारांनी व्यक्त केला होता संशय
खासदार शरद पवार यांना केंद्र सरकारने झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय ययापूर्वी घेतला होता. पण पवार यांनी सुरक्षा नाकारली होती. शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी 55 सशस्त्र सीआरपीएफ जवानांची तुकडी तैनात केली जाणार होती. Sharad Pawar |
मात्र, शरद पवारांनी केंद्राच्या झेड प्लस सुरक्षेवर संशय व्यक्त केला होता. झेड प्लस सुरक्षा म्हणजे निवडणुकीच्या काळात ऑथेन्टिक माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते, असं शरद पवार म्हणाले. आता पुन्हा एकदा शरद पवार यांना सुरक्षा घेण्यासाठी केंद्रीय यंत्रणा आग्रह करणार असल्याचे बोलले जात आहे. Sharad Pawar |
हेही वाचा :
महाविकास आघाडीत 260 जागांवर एकमत ; ‘या’ जागांवर अजूनही मतभेद कायम





