मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या रणधुमाळीत वेग आला असताना, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. ही यादी अतिशय मर्यादित असून, केवळ ७ उमेदवारांची नावे समोर आली आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी अंतर्गत उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यात युतीची चर्चा सुरू आहे. मात्र, जागावाटपावर अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याने NCP-SP ने स्वतंत्रपणे ही मर्यादित यादी प्रसिद्ध केली आहे. पक्षाच्या मुंबई विभागीय निवडणूक प्रभारी अध्यक्ष मिलिंद कांबळे आणि सहअध्यक्ष सोहेल सुभेदार यांच्या मान्यतेने ही यादी जाहीर करण्यात आली असून, सर्व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत. उमेदवारांची नावं खालीलप्रमाणे 1) वॉर्ड क्रमांक – 43 – अजित रावराणे 2) वॉर्ड क्रमांक 140 – संजय भिमराव कांबळे 3) वॉर्ड क्रमांक 78 – रदबा जावेद देऊलकर 4) वॉर्ड क्रमांक 48 – गणेश शिंदे 5) वॉर्ड क्रमांक 70 रुही मदन खानोलकर 6) वॉर्ड क्रमांक 51 – आरती सचिन चव्हाण 7) वॉर्ड क्रमांक 112 – मंजू रविंद्र जायस्वाल ही यादी ऐन निवडणुकीच्या तोंडावर जाहीर झाली असून, युती अंतिम झाल्यास जागा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, अजित पवार गटाच्या NCP ने स्वबळावर ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे, तर काँग्रेस आणि इतर पक्षांनीही आपल्या याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. BMC निवडणुकीत २२७ जागांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान आहे.