Sharad Pawar NCP | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी (२८ जानेवारी) विमान अपघातात निधन झालं. धडाडीच्या नेत्याने अकाली एक्झिट घेतल्याने महाराष्ट्रासह पवार कुटुंबीय शोकसागरात बुडाले आहेत. अजित पवार यांच्या मृत्यूमुळे पक्षासमोर देखील मोठा पेचप्रसंग निर्माण झाला असून दादांच्या जागी कोण? हा प्रश्न सोडवावा लागणार आहे. तत्पूर्वी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शरद पवार व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होत. दोन्ही पवार एकत्र येणार अशा चर्चा देखील सुरु होत्या. मात्र त्यापूर्वीच अजित पवारांचं निधन झाल्यानं, हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याच्या शक्यतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. राष्ट्र्वादीबाबतचा निर्णय शरद पवार घेणार? | Sharad Pawar NCP हा संभ्रम निर्माण झाला असतानाच आता पवार कुटुंबीय एकत्र बसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत पुढील निर्णय घेतील अशी माहिती मिळतेय. पवार कुटुंबाचे प्रमुख या नात्याने शरद पवार हे चर्चेनंतर या बाबतचा निर्णय घेणार असल्याचं देखील सूत्रांच्या हवाल्याने समजतंय. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर देखील पवार कुटुंब म्हणून एकत्रचं राहिल्याचं चित्र पाहायला मिळालं होत. गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय जवळीक देखील वाढली होती. अशात अजितदादांच्या मृत्यूनंतर सर्व कुटुंबीय एकत्र येऊन निर्णय घेतील, या शक्यतेला बळ मिळतं. | Sharad Pawar NCP Mumbai : राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्याची भेट; ‘त्या’ प्रस्तावाची चर्चा अन् प्रफुल्ल पटेल म्हणाले… सुनेत्रा पवारांकडे पक्षाची धुरा अन् उपमुख्यमंत्रीपद? | Sunetra Pawar DCM अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात यावी असा एक मतप्रवाह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहे. पक्षाचे आमदार नरहरी झिरवाळ यांनी याबाबत स्पष्ट मागणी देखील केली आहे. अशातच आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर बडे नेते देखील उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद पवार कुटुंबाकडे राहावे अशीही इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची असल्याचं बोललं जातंय. सुनेत्रा पवार यांचंच नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. काय म्हणाले प्रफुल्ल पटेल? | Prafull Patel on NCP मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरात लवकर पुढील निर्णय घ्यायचा असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिल्याचं सांगितलं. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या हालचाली सुरु असल्याबाबत विचारले असता, प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाबाबत मुख्यमंत्र्यांशी कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती दिली. याबाबतचा निर्णय पक्षाच्या सर्व आमदारांना विचारात घेऊन घेण्यात येईल असेही ते म्हणाले. Narhari Zirwal : सुनेत्रा पवार यांंना उपमुख्यमंत्री करा! आता नरहरी झिरवाळांचे दुसरे मोठं वक्तव्य म्हणाले….