Sharad Pawar । पक्षचिन्ह मिळताच जितेंद्र आव्हाडांचा नवा नारा,’वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी…’

Sharad Pawar । शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार या पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी (तुतारी फुंकणारा माणूस ) हे नवं निवडणूक चिन्ह दिलं आहे. पुढील आदेश येईपर्यंत आता येणाऱ्या निवडणुकीत शरद पवार गटाला आता हे चिन्ह वारण्याचे आदेश देण्यात आले आहे. यावर आज शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत “वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी…” असा नवा नारा दिला आहे.
निवडणूक आयोगाकडे आम्ही ज्या तीन निशाणी सुचविल्या होत्या. त्यातील चिन्ह न देता आम्हाला त्यांनी “तुतारी” हे चिन्ह दिले. लढण्यासाठी शुभेच्छाच दिल्या आहेत. हा आमच्यासाठी ‘शुभसंकेत’ आहे. याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार मानतो. कारण, त्यांनी सांकेतिक भाषेत ‘तुम्ही युद्धाला उभे रहा आणि…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 23, 2024
नेमक काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?
एका योद्ध्याला शोभेल असंच हे पक्षचिन्ह आहे. ८४ वर्षांचा म्हातारा, होय मी त्यांना असंच म्हणतो. कारण ८६ वर्षांचा म्हातारा युद्धाला उभा राहिला आहे आणि संकेत काय मिळाले आहेत? तर तुतारी. वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी. तुतारी वाजली आहे, युद्धासाठी आम्ही आता तयार आहोत. शरद पवार युद्धाला उभे आहेत. महाराष्ट्रातल्या राजकीय भूमीतले भीष्माचार्य म्हणजे शरद पवार त्यांच्यासह आम्ही ही लढाई लढण्यासाठी तयार आहोत. लडेंगे और जितेंगे.. परत एकदा सांगतो.. वाजवा तुतारी. असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे.





