नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूरमध्ये भाजपच्या नागपूर ग्रामीण युनिटमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. या कार्यक्रमामध्ये त्यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. यावेळी नितीन गडकरींनी ‘शरद पवार हे म्हणजे जपानी गुडिया प्रत्येकाला वाटतं की, ती आपल्याकडे बघूनच डोळा मारत आहे’, असे म्हणत नितीन गडकरी यांनी शरद पवार यांना सणसणीत टोला लगावला आहे.
या कार्यक्रमात ‘जपानी गुडिया जशी प्रत्येकाकडे बघून डोळा मारते तसचं काहीसं शरद पवारांचं आहे. कार्यकर्त्याला असचं वाटतं साहेब आपल्याकडे बघून बोलत आहेत, कामाला लागा. पण त्यानंतर तिकीट मात्र भलत्यालाच मिळते’, असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. या कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सल्ला देखील दिला आहे. यावेळी बोलतांना गडकरी म्हणाले की, ‘थिंक फॉर द बेस्ट अॅन्ड प्रीपेअर फॉर द वर्स्ट.’ वर्स्ट’ असे त्यांनी म्हटले.
पुढे बोलतांना गडकरी म्हणाले की, ‘आपण नेहमी आपलं काम व्यवस्थित करावं. मिळालं तर बोनस नाही मिळालं तर दु:ख नाही.’ पण नेत्यांना चॉकलेट वाटण्याशिवाय पर्याय नसतो अशी मिश्लिक टीप्पणी देखील गडकरींनी यावेळी केली.
नितीन गडकरींना शरद पवारांच्या बाबत केलेल्या या वक्तव्यामुळे राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तसेच आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून गडकरींच्या या टीकेला काही उत्तर मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.