मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे. निवडणूक पत्राबाबत त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. यासंदर्भातील माहिती त्यांनी स्वतः पत्रकार परिषदेत दिली आहे. देशातील सगळ्या संसद सदस्यांमध्ये आमच्यावर विशेष प्रेम आहे याचा आनंद आहे, असा खोचक टोला शरद पवार यांनी लगावला आहे.
२००९, २०१४ आणि २०१९ या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस असून काही बाबतीत स्पष्टीकरण मागवले आहे. नोटीस आधी मला आली, आता सुप्रियाला येणार आहे असे कळले चांगली गोष्ट आहे. संपूर्ण देशातील इतक्या सदस्यांपैकी आमच्यावर विशेष प्रेम आहे याचा आनंद आहे. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरुन मला ही नोटीस आली. त्याचे उत्तर लवकरच मी देईन. कारण उत्तर दिले नाही तर दिवसाला 10 हजार दंड असल्याचा उल्लेख नोटीसमध्ये आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.
दरम्यान, तसेच, इतक्या घाईत दोन्ही विधेयके एकत्र संमत करण्याची गरज नव्हती. केंद्राच्या कृषी धोरणात विरोधाभास असल्याची टीकाही शरद पवार यांनी केली आहे.