महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी होणार जागावाटप जाहीर

मुंबई : राज्याच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. आता महाविकास आघाडीमधून जागा वाटपाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप कधी जाहीर होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याचदरम्यान, महाविकास आघाडीच्या जागावाटपावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठं भाष्य केलं आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ?
आज महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये महत्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी जागावाटपाविषयी मोठं भाष्य केलं. जितेंद्र आव्हाड म्हणाले, ‘महाविकास आघाडीचं घटस्थापनेला जागावाटप बहुतांश पूर्ण होईल. दसऱ्याच्या मुहूर्तावर बहुतांशी जागांचा जागावाटप महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष जाहीर करतील. काही जागा आहेत. प्रत्येक विभागात या जागांवर दोन पक्ष किंवा तीन पक्ष दावा करतात. तर ते काही ठिकाणी भांडूद्यात. थोडा फार तर तिढा राहणारच. त्यामुळे त्याचं टेन्शन कोणी घेऊ नये, यावर सुद्धा निर्णय होईल’.असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
या बैठकीला शिवसेना (ठाकरे गट) कडून संजय राऊत अनिल देसाई तर राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट) कडून जयंत पाटील अनिल देशमुख जितेंद्र आव्हाड तसेच काँग्रेसकडून नाना पटोले,बाळासाहेब थोरात,विजय वडेट्टीवार उपस्थित होते.





