बारामतीः राज्यातील विविध प्रश्नाबांबत माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आमदार जयंत पाटील पक्षाला सोडून जाणार असल्याच्या चर्चांवर त्यांनी आपले मत मांडले. तसेच नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार हे लग्न बंधनाच अडणार असल्याची बातमी समोर आली. शरद पवार यांनी यावर प्रश्न विचारला असता ते चांगलेच भडकले आणि हा काही प्रश्ना आहे का असा जाब त्यांनी प्रश्न विचारणाऱ्याला विचारला. त्यांच्या या विधानाची सर्वत्र मोठी चर्चा होत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या फेसबुकवरून जय पवार लग्नबंधनात अडकत असल्याबाबतची माहिती देत काही फोटोही शेअर केले होते. यानंतर पवार कुटुंबाबद्दल अनेक बातम्या समोर आल्या. तसेच पवार घराण्याच्या होणाऱ्या सुनाबाई ऋतुजा पाटील यांच्याबद्दलही माध्यमांमध्ये माहिती देण्यात आली. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचा आशिर्वाद घेतला. तो प्रश्न अन् पवार भडकले जय पवारांच्या साखरपुड्याला जाणार का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला असता ते भडकले आणि म्हणाले की, हा काही प्रश्न आहे का विचारायचा? असा प्रश्न त्यांनी प्रश्न विचारणाऱ्याला केला आहे. त्यांच्या या उत्तराची राज्यभरात मोठी चर्चा होत आहे. जय पवार आणि ऋतुजा पाटील हे दोघेही लवकरच विवाहबंधनात अडणार आहेत. तत्पूर्वी दोघांचा साखरपुडा होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे यानिमित्ताने पवार कुटुंब एकत्र येणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. जयंत पाटील पक्ष सोडून जाणार असल्याच्या चर्चेवरही शरद पवार म्हणाले जयंत पाटील यांनी त्यांची भूमिका कालच स्पष्ट केली आहे, असे सांगितले. त्यांनी काल दि. १४ मार्च रोजी बारामतीमध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा केली जात होती. यावेळी राज्यातील प्रश्न विचारू नका राष्ट्रीय विचारा असेही शरद पवार म्हणाले. भाष्य करणं टाळलं… मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर शरद पवार यांनी मस्साजोगला भेट दिली होती. तसेच देशमुख कुटुंबीयांशी संवादही साधला होता. वैभवी देशमुख हिचा शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलणार असल्याचे पवार त्यावेळी म्हणाले होते. त्यानुसार बारामतीमध्ये तिच्या शिक्षणाची पूर्ण सोय करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. अंजली दमानिया यांनी केजच्या न्यायाधिशाचे होळी खेळतानाचा फोटो शेअर केला, यावर प्रश्न विचारला असता शरद पवार यांनी भाष्य करणे टाळले असल्याचे पाहायला मिळाले.