‘मी ज्योतिषी नाही, पण मविआला…’ ; शरद पवारांची मतदानानंतरची पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar । राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन होईल असे भाकीत वर्तवले.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बहुमत मिळेल Sharad Pawar ।
मतदानानंतर बोलताना शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी,”मी काही ज्योतिषी नाही. पण एकूण चित्र असं दिसतंय की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बहुमत मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच “मला असं दिसतंय की, इकडे सत्तापरिवर्तन होईल, लोकांना बदल अपेक्षित आहे, असेही शरद पवार यांनी म्हटले. यावेळी शरद पवार यांनी अजित पवारांनी महायुतीला बहुमत मिळण्याचा जो दावा केला होता, त्याची खिल्ली उडवली.
यावेळी शरद पवार यांनी राज्यातील नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले की, महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या हातात आहे. प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 67 टक्के मतदान झाले होते. तर ईशान्येकडील राज्यांमध्ये त्यावेळी मतदानाची टक्केवारी 75 ते 80 टक्के इतकी होती. महाराष्ट्राने मतदानाच्या टक्केवारीत मागे राहणे, हे अशोभनीय आहे. म्हणून माझं आवाहन आहे, मतदानाचा हक्क हा कोणत्याही परिस्थितीत बजावला पाहिजे. तुम्हाला जो राजकीय पक्ष आणि व्यक्ती योग्य वाटेल, त्यांना मतदान करा. पण मतदान जरुर करा, असे शरद पवार यांनी सांगितले.
“Person who made allegations was in jail for several months..”: Sharad Pawar defends Sule over alleged “bitcoin scam”
Read @ANI Story | https://t.co/E9nzW30FsD#SharadPawar #SupriyaSule #Maharashtra pic.twitter.com/pDI7K4ld8R
— ANI Digital (@ani_digital) November 20, 2024
महाराष्ट्रात साधारणत: साधारणत महाराष्ट्रात शांततेत मतदान होते. पण नागपूर जिल्ह्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख हल्ला झाला, तो अस्वस्थ करणारा होता. महाराष्ट्रात दरवेळी तुरळक प्रकार वगळता शांततेत मतदान पार पडते. पण यंदा तसे घडताना दिसत नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.
माझ्याकडे ऑथेटिंक माहिती असल्याशिवाय मी बोलणार नाही Sharad Pawar ।
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मंगळवारी विरारमध्ये पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणातबाबत बोलताना शरद पवार यांनी सावधपणे प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, सदर प्रकरणाबाबत ऍक्क्चुअल गोष्टी मला नक्की माहिती नाहीत. त्यामुळे मी लगेच त्यावर भाष्य करणार नाही. ज्यांच्यावर आरोप केला जातो, त्यांना मी थोडसं ओळखतो. माझ्याकडे ऑथेटिंक माहिती असल्याशिवाय मी बोलणार नाही, असे शरद पवार यांनी सांगितले.





