शरद केळकर दिसणार नव्या भूमिकेत; ‘रानटी’ चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज

Sharad Kelkar New Movie | अभिनेता शरद केळकरने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये देखील उत्तम अभिनय करत प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. लवकरच तो एका नव्या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शरद केळकरच्या या सिनेमाचे नाव ‘रानटी’ आहे. नुकतेच याचे पोस्टर रिलीज झाले असून यातील त्याचा कधी न पाहिलेला लुक पाहायला मिळत आहे.
चित्रपटातील भूमिकेबद्दल बोलताना शरद म्हणाला, “यात मी अधर्मी वृत्तींचा नाश करणार्या विष्णूची भूमिका केली आहे. अशा प्रकाराची भूमिका साकारणे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. उत्तम आणि पॉवरफुल दिग्दर्शक समित कक्कड यांच्या तगड्या आणि जबरदस्त ‘रानटी’ चित्रपटाच्या निमित्ताने हा वेगळा रोल मला करता आला याचा आनंद आहे”. Sharad Kelkar New Movie |
View this post on Instagram
दिग्दर्शक समित कक्कड यांचा हा चित्रपट २२ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून महाराष्ट्रातील न्यू ‘अँग्री यंग मॅन’ शरद केळकरच्या रूपाने मिळणार असल्याचे समित यांनी सांगितलं. समित कक्कड फिल्म्स प्रॉडक्शन्स आणि सन्स ऑफ साॅइल मीडिया प्रा. लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने येणार्या या चित्रपटाच्या निर्मीती पुनीत बालन यांनी केली आहे.
या सिनेमासाठी हृषिकेश कोळी यांचं लिखाण, अजित परब यांचं संगीत, अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत, एझाज गुलाब यांची साहसदृष्ये, सेतु श्रीराम यांचं छायाचित्रण, आशिष म्हात्रे यांच संकलन चित्रपटाला लाभलेले आहे. Sharad Kelkar New Movie |
निर्माते पुनीत बालन म्हणाले की, ‘रानटी’ चित्रपटाच्या निमित्ताने एक चांगली टीम झाली आहे. दिग्दर्शक समित कक्कड याने नेहमीच आपल्यातील वेगळेपण दाखविला आहे. त्याच्या साथीने मराठीत एक वेगळा प्रयत्न आम्ही ‘रानटी’ चित्रपटाच्या निमित्ताने केला आहे. हा प्रयत्न प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. चित्रपटाचं पोस्टर आणि चित्रपटाचं नाव यावरून ‘रानटी’ प्रेक्षकांचं मनोरंजन करून पैसा वसुल करणार हे नक्की.” २२ नोव्हेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.
हेही वाचा:
“राहुल गांधी हे देशाचे नंबर एकचे दहशतवादी”; केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू यांचे विधान





