Sharad Kalaskar Bail : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात दोषी असलेल्या शरद कळसकरला (Sharad Kalaskar Bail) मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठाने त्याला ५० हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. सरकारी पक्षाने न्यायालयाला विनंती केली होती की, आपल्या या आदेशाच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी, परंतु न्यायालयाने ती विनंती फेटाळून लावली. कळसकरवर (Sharad Kalaskar Bail) कम्युनिस्ट नेते आणि विचारवंत गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणीही खटला सुरू आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये उच्च न्यायालयाने त्याला त्या प्रकरणातही जामीन मंजूर केला होता. दाभोळकर हत्या प्रकरणातही जामीन मिळाल्यामुळे जामिनाशी संबंधित कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर कळसकर आता तुरुंगातून बाहेर येऊ शकेल. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांनी केला होता. Sharad Kalaskar Bail परंतु दाभोळकर यांची कन्या मुक्ता दाभोळकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे, २०१४ मध्ये या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्यात आला. १० मे २०२४ रोजी सत्र न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळसकरला (Sharad Kalaskar Bail) दाभोळकरांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. तथापि, पुराव्यांच्या अभावामुळे न्यायालयाने वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले होते.