शिरूर बाजार समितीच्या सभापतीपदी शंकर जांभळकर

Updated On:

बिनविरोध निवड : उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून शिक्‍कामोर्तब

शिरूर (प्रतिनिधी) – शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी शंकर जांभळकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक शिरूर हर्षित तावरे यांनी जाहीर केले.


शिरूर बाजार समितीच्या सभापतीपदीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. तर अनेकांनी पक्षश्रेष्ठींकडे “फिल्डिंग’ही लावली होती. परंतु अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नेहमीप्रमाणे दिलेल्या बंद लिफाफा निवडणूक निरीक्षक तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या मार्फत पाठवण्यात आला. या लिफाफ्यात संचालक शंकर जांभळकर यांचे नाव सभापतीसाठी आले.

यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यालयात झालेल्या बैठकीस अशोक पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या उपस्थितीत शंकर जांभळकर यांचे नाव जाहीर करण्यात आले. दरम्यान, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता यानंतर आज शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीची विशेष सभामध्ये सभापती निवडणुकीसाठी सहाय्यक निबंधक हर्षित तावरे यांनी बोलवली होती. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून आबाराजे मांढरे, शंकर जांभळकर व वसंत काका कोरेकर यांची नावे आघाडीवर होती. परंतु आजच्या या निवडणुकीत शंकर जांभळकर यांचे नाव जाहीर झाल्याने 15 दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्य वर अखेर पडदा पडला.

निवडणुकीप्रसंगी राष्ट्रवादीचे संचालक शशिकांत दसगुडे, विश्‍वास ढमढेरे, प्रकाश पवार, शंकर जांभळकर, वसंत कोरेकर, मंदाकिनी पवार, विकास शिवले, सतीश कोळपे, मानसिंग पाचुंदकर, धैर्यशील उर्फ बाबाराजे मांढरे, तृप्ती भरणे, विजेंद्र गद्रे, प्रवीण चोरडिया, सुदीप गुंदेचा, बंडु जाधव. तर भाजपाचे संचालक राहुल गवारे, संतोष मोरे, छाया बेनके, शिरूर बाजार समिती सचिव अनिल ढोकणे उपस्थित होते. 

भाजपच्या दोघांच्या हाती घड्याळ
शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण 19 संचालक असून, यातील18 संचालकांना मतदानाचा हक्क असून ,पणन प्रक्रिया संचालकाला मतदानाचा हक्‍क नसल्याने त्यात राष्ट्रवादीचे 15 तर भाजप पक्षाचे 3 संचालक आहेत. भाजपचे बाजार समिती संचालिका छाया बेनके, त्यांचे पती संभाजी बेनके या संचालक यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला, यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादीची ताकद आणखीच वाढली आहे.

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती पदासाठी संधी मिळाली असून, शिरूर बाजार समितीची सुरू असलेली विकासाची परंपरा पुढे नेणार आहे. बाजार समितीमध्ये शेतकरी हिताचे व शेतकऱ्यांना फायदा होईल असे निर्णय घेतले जातील याकडे सर्वाधिक लक्ष दिले जाईल. या निवडणुकीत संधी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अशोक पवार यांचा आभारी आहे.
– शंकर जांभळकर, नवनिर्वाचित सभापती, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती


शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात झाली असून यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सर्वांच्या आदेशानुसार झाली आहे. यापुढील काळात बाजार समितीचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगून आंतरिक तऱ्हा बरोबर इतर काही जणांना ही संधी मिळणार आहे.
– अशोक पवार, आमदार, शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघ

आणखी संबंधित बातम्या

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

2026-10-08 09:35:23

Sunetra Pawar on Nana Patekar: "अभिनयाचा एक युगपुरुष हरपला…!" ; अजित पवारांसोबतचा फोटो शेअर करत सुनेत्रा पवारांनी नानांना वाहिली श्रद्धांजली

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

2026-10-07 22:22:29

Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्तींना मोठी जबाबदारी; कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मिळाले ‘हे’ पद

State Name Change : थेट राज्याचं नावच बदलणार? भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा, नवं नावही सुचवलं

2026-10-07 19:26:25

State Name Change : थेट राज्याचं नावच बदलणार? भाजप प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा, नवं नावही सुचवलं

Village Committee Election : 'या' राज्यात बॅलेट पेपरवर मतदान, तरीही काँग्रेसचा दारुण पराभव

2026-10-07 19:06:35

Village Committee Election : 'या' राज्यात बॅलेट पेपरवर मतदान, तरीही काँग्रेसचा दारुण पराभव

West Bengal : पश्चिम बंगालचे नाव बदलून 'पश्चिम बंग' होणार; 'या' नेत्याची मोठी घोषणा

2026-10-07 17:37:34

West Bengal : पश्चिम बंगालचे नाव बदलून 'पश्चिम बंग' होणार; 'या' नेत्याची मोठी घोषणा