Satara | शालेय तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश

सातारा, (प्रतिनिधी) – जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्यावतीने नुकत्याच झालेल्या शालेय तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत येथील के. एस. डी. शानभाग विद्यालय आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी 14 व 19 वर्षांखालील मुलींचा गटामध्ये यश मिळवले.
इयत्ता सातवीतील रिया सागर कापसे हिने 14 वर्षांखालील वयोगटात रिदमिक प्रकारात प्रथम आणि पारंपरिक प्रकारात पाचवा क्रमांक मिळवला. इयत्ता दहावीतील सुभाषी जगदीश शिंदे हिने 19 वर्षांखालील मुलींचा वयोगटात पारंपरिक व रिदामिक प्रकारात प्रथम क्रमांक मिळवला.
या विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय योग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थिनींना सौ. सुवर्णा वाघमारे व सौ. विमल ढेरे यांचे मार्गदर्शन मिळाले. महाविद्यालयाचे संस्थापक व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग,
संस्थेच्या संचालिका सौ. आँचल घोरपडे, विश्वस्त सौ. उषा शानभाग, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. रेखा गायकवाड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी, क्रीडा विभागप्रमुख अभिजित मगर, पालक संघाचे प्रतिनिधी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले.





