Shamita Shetty: शमिता शेट्टीने अफेअरच्या अफवांवर दिली स्पष्ट प्रतिक्रिया
Shamita Shetty: बॉलीवूड अभिनेत्री शमिता शेट्टी सध्या चर्चेत आहे. 2 फेब्रुवारी रोजी तिने आपला 47 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिने बहिण शिल्पा शेट्टी आणि जीजा राज कुंद्रासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
Updated On:

Shamita Shetty: बॉलीवूड अभिनेत्री शमिता शेट्टी सध्या चर्चेत आहे. 2 फेब्रुवारी रोजी तिने आपला 47 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिने बहिण शिल्पा शेट्टी आणि जीजा राज कुंद्रासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंमध्ये तिच्यासोबत एक बिजनेसमन दीपेशही दिसत होता. त्यामुळे सोशल मीडियावर शमिता आणि दीपेश यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या.
Shamita Shetty
या अफवांवर आता शमिता शेट्टीने स्वतः प्रतिक्रिया दिली आहे. 4 फेब्रुवारी रोजी तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीत लिहिले की, “मी सिंगल आहे आणि शांत आयुष्य जगते आहे. खऱ्या मैत्रीचा चुकीचा अर्थ काढणं थांबवा. हे सगळं अगदीच बकवास आहे.”
शमिताने स्पष्ट शब्दांत या अफवा फेटाळून लावल्या आहेत. वाढदिवसाच्या फोटोंनंतर आणि दीपेशच्या पोस्टवर तिने केलेल्या कमेंटमुळे गैरसमज पसरला, मात्र दोघांमध्ये केवळ मैत्री असल्याचं तिने सांगितलं आहे. त्यामुळे शमिताच्या अफेअरच्या बातम्यांना पूर्णविराम मिळाला आहे.





