करमाळा – करमाळा तालुक्यातील कॉंग्रेसचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे पुत्र शंभुराजे जगताप यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जगताप भाजपमध्ये आले. जगताप यांच्या भाजप प्रवेशामुळे निवडणुकीत भाजपचा दावा आणखी मजबूत झाला असेही पाटील यांनी म्हटले आहे.
यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते. अंतर्गत राजकारणामुळे जगताप यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे, असे बोलले जाते.