satara | शाहूपुरी विद्यालयाचा दहावीचा निकाल ९६.३६ टक्के

सातारा, (प्रतिनिधी) – राष्ट्रीय एकात्मता विकास कार्य संघ शाहूपुरी सातारा संचलित शाहूपुरी माध्यमिक विद्यालयाचा मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या एस.एस.सी.परिक्षेचा निकाल ९६.३६ टक्के एवढा लागला असून आरती मोतीराम पंचकर हिने ८८.४० टक्के गुण मिळवत प्रथम, समृध्दी चंद्रकांत देसाई हिने ८८ टक्के गुण मिळवत द्वितीय, प्रेम शिवाजी शेलार याने ८६.६० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.
या परीक्षेसाठी एकुण ५५ विद्यार्थी बसले होते.त्यापैकी ५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यातील १५ विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये (विशेष श्रेणी), २० विद्यार्थी प्रथम श्रेणीत,१३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर ५ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
ग्रामीण भागातील,वाडी- वस्तीतील सर्वसामान्य कुटुंबातील असणाऱ्या मुलांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत आपल्या आयुष्यातील एस.एस.सी.परिक्षेचा पहिला टप्पा परिश्रमपूर्वक पूर्ण केल्याचे विशेष समाधान संस्था व विद्यालय प्रशासनास नक्कीच असल्याचे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भारत भोसले यांनी यानिमित्ताने व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, प्रा. श्रीधर साळुंखे, यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, सातारा पॉलिटेक्निकचे माजी उपप्राचार्य प्रा. के. ए.गव्हाणे ,
नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सुरेश पांढरपट्टे, प्रा. सौ. मिरा दीक्षित, रमेश दीक्षित, माजी शाखाप्रमुख सौ. निर्मला मतकरी हणमंतराव पालेकर, जि. प. कॉलनीचे चेअरमन राजेंद्रकुमार मोहिते, प्रा .डॉ.सुजित जाधव तसेच संस्था व शाला व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्यांनी अभिनंदन केले.

