नवी दिल्ली – बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच, अभिनेता ‘शाहरुख खान’ सध्या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. नुकतंच अभिनेत्यानं त्याच्या आगामी “डँकी’ चित्रपटाचं सौदी अरेबिया मधील शूटिंग पूर्ण केलं आहे. स्वतः शाहरुख खानने याबद्दल माहिती दिली आहे. अभिनेत्याने सोशल मीडियावर या संदर्भातील एक पोस्ट देखील शेअर केली आहे. व्हिडिओमध्ये शाहरुखने चित्रपटातील कलाकार आणि क्रूचे आभार मानले आहेत. तसेच सौदी अरेबियाच्या संस्कृती आणि चित्रपट मंत्रालयाचे आभार मानले असल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, चित्रपटाचं शुटिंग संपल्यानंतर शाहरुखने मक्का या पवित्र शहराला भेट दिली आणि मक्का येथे इस्लामिक तीर्थक्षेत्र उमराह केल्याचं म्हंटलं आहे. मात्र, नुकतंच अभिनेत्यानं आणखी एक खुलासा केला आहे. यामध्ये शाहरुख खानने ‘आपण गेली चार वर्ष एकही चित्रपट का? केला नाही’ याबद्दल त्यानं स्वतः सांगितलं आहे. एका मुलाखतीमध्ये शाहरुख बोलत होता.
यावेळी शाहरुख म्हणाला की, “मी गेल्या चार वर्षांत जाणीवपूर्वक कोणताही चित्रपट घेतला नाही. त्यामागचं कारण होती सुहाना. सुहाना चित्रपटा विषयक अभ्यासक्रम शिकण्यासाठी लंडनहून अमेरिकेला गेली होती. तिथं ती एकटी रहात होती. त्यामुळे तिला कधीही एकाकी वाटू शकेल, तिचा मला फोन येईल आणि ती मला तिथं बोलवून घेईल असं मला वाटायचं.’ आणि याच एका कारणामुळे मी गेले चार वर्ष कोणताच चित्रपट केला आहे.
अभिनेता पुढे म्हणाला, “परंतु अमेरिकेत गेल्यानंतर तिचा मला कधी फोनच आला नाही. न राहून मीच तिला फोन केला आणि विचारलं की, ‘सुहाना, मी आता कामाला सुरुवात करू का? त्यानंतर मी चित्रपटाला पुन्हा केली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. थोडक्यात शाहरुखच्या म्हणण्याप्रमाणे सुहानाच्या काळजीपोटी त्यानं गेल्या चार वर्षांत एकही चित्रपट केला नाही. आणि कॅमेऱ्या पासून दूर राहिला.