Shahnawaz Hussain। जमियत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलाना अर्शद मदनी यांनी देशातील मुस्लिमांबाबत केलेल्या विधानानंतर आरोप-प्रत्यारोपांची मालिका तीव्र झाली आहे. मदनी यांनी, “लंडन आणि न्यूयॉर्कसारख्या मोठ्या शहरांमध्ये मुस्लिम महापौर होऊ शकतात, तर भारतात तीच व्यक्ती विद्यापीठाचा कुलगुरूही होऊ शकत नाही.”असे म्हणत वादाला तोंड फोडले होते. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शाहनवाज हुसेन यांनी मदनी यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. शाहनवाज हुसेन यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत, “मौलाना अर्शद मदनी यांचे विधान अत्यंत बेजबाबदार आणि निंदनीय आहे. त्यांनी भारताची बदनामी केली आहे. जगातील इतर कोणत्याही देशात अल्पसंख्याकांना भारतात जितके अधिकार आहेत तितके अधिकार मिळालेले नाहीत. भारतीय मुस्लिमांसाठी भारतापेक्षा चांगला देश नाही, हिंदूंपेक्षा चांगला मित्र नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींपेक्षा चांगला नेता नाही. आपला देश ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या ब्रीदवाक्यावर चालतो.”असे त्यांनी म्हटले. मुस्लिम अनेक शहरांमध्ये महापौर झाले Shahnawaz Hussain। पुढे ते म्हणाले की, “आमचे मुस्लिम अनेक शहरांमध्ये महापौर बनले आहेत आणि त्यांनी उच्च संवैधानिक पदे भूषवली आहेत. एक भारतीय मुस्लिम राष्ट्रपती, मुख्य न्यायाधीश, क्रिकेट आणि हॉकी संघांचा कर्णधार आणि हवाई दलाचा प्रमुख बनू शकतो. एक भारतीय मुस्लिम आधीच देशातील सर्वोच्च पद, राष्ट्रपतीपद भूषवले आहे. तरीही, मौलाना अर्शद मदनी अशी विधाने करत आहेत.” मदनी यांनी माफी मागावी Shahnawaz Hussain। भाजप प्रवक्ते पुढे म्हणाले की, “जमियत उलेमा-ए-हिंदने स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली हे खरे असले तरी, ते आता काँग्रेसप्रमाणेच घराणेशाहीचे बळी पडले आहे. ते सर्वांसाठी आपले दरवाजे उघडत नाही. भारतातील मुस्लिमांवर अत्याचार होत आहेत आणि त्यांना त्रास सहन करावा लागत आहे असे म्हणणे पूर्णपणे खोटे आणि बेजबाबदार आहे. मौलाना अर्शद मदनी यांनी त्यांच्या विधानाबद्दल माफी मागावी.”अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.