शाहीद कपूरच्या “जर्सी’चे प्रदर्शन पुढे ढकलले, चाहत्यांची निराशा

मुंबई – शाहिद कपूर नेहमीच आपल्या रोलमध्ये शिरून त्या भूमिकेला न्याय देत असतो. त्याने साकारलेल्या रोलबद्दल त्याला नेहमीच प्रेक्षकांची दाद मिळाली आहे. आता “जर्सी’तील क्रिकेटपटूच्या रोलसाठीही त्याने अशीच मेहनत घेतली आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून सध्या देशभरात जर्सीचे धमाक्यात प्रमोशन होत असताना आता या चित्रपटाला कोरोनाचा फटका बसला आहे.
जर्सी हा चित्रपट येत्या 31 डिसेंबरला रिलीज होणार होता. मात्र, कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने निर्मात्यांनी या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरात करोनाचा पुन्हा झालेला उद्रेक आणि त्याअनुषंगाने मॉल-चित्रपटगृहांवर वाढत चाललेले र्निबध यामुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
दरम्यान, “जर्सी’ याच नावाने तेलगूमध्ये आलेल्या मूळ सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे. “जर्सी’ हा एका अपयशी परंतु गुणवान क्रिकेट खेळाडूवर आधारित सिनेमा आहे. आपल्या मुलाच्या इच्छेखातर वयाच्या तिशीनंतर भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन करणाऱ्या खेळाडूची कथा आहे.





