Shah Rukh Khan King Movie : ‘डर नही दहशत हूँ’ शाहरुख खानच्या ‘किंग’ सिनेमाची रिलीज डेट जाहीर
Shah Rukh Khan King Movie : शाहरुख खानचा 'किंग' चित्रपट 24 डिसेंबर 2026ला रिलीज होणार आहे. म्हणजेच ख्रिसमसच्या आदल्या दिवशी किंग आपल्या भेटीला येणार आहे.

Shah Rukh Khan King Movie : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या बिग बजेट ‘किंग’ सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच या सिनेमाचा नवा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून रिलीज डेटही समोर आली आहे. शाहरुख खानने एका खास अंदाजात व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
शाहरुख खानचा ‘किंग’ चित्रपट 24 डिसेंबर 2026ला रिलीज होणार आहे. म्हणजेच ख्रिसमसला किंग आपल्या भेटीला येणार आहे.’किंग’ सिनेमाच्या नव्या टीझरमध्ये शाहरुखचा नवा अवतार पाहायला मिळत आहे. Shah Rukh Khan King Movie :
टीझरच्या सुरुवातीला बर्फाचा हिमालय दिसत असून शाहरुख उभा असल्याचं दिसत आहे. काही अॅक्शन सीन्सही या टीझरमध्ये पाहायला मिळत आहेत.
‘डर नही दहशत हूँ’ असा दमदार डायलॉगही शाहरुखच्या तोंडी या टीझरमध्ये आहे. हा टीझर पाहून सिनेमाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. Shah Rukh Khan King Movie :
View this post on Instagram
या व्हिडीओला त्याने खूप खास कॅप्शन दिलं आहे. लिहिलं की, “किंग चित्रपटगृहांमध्ये गर्जना करण्यास सज्ज आहे.” त्यांच्या या व्हिडीओवर चाहते आणि कलाकार मंडळी तुफान कमेंट्स करत आहेत. तसेच सिनेमासाठी किंग खानला शुभेच्छा देताना दिसत आहे.
शाहरुख खानला दुखापत
‘किंग’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शाहरुख खानच्या हाताला दुखापत झाली. ‘किंग’मध्ये शाहरुख खान जबरदस्त अॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळणार आहे. शाहरुख खान ‘किंग’ मध्ये ‘अंडरवर्ल्डचा किंग’च्या भूमिकेत पाहायला मिळणार असल्याचे बोले जात आहे.
दरम्यान, २४ डिसेंबर २०२६ रोजी शाहरुखचा ‘किंग’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण देखील झळकणार आहे.
याशिवाय ‘किंग’ सिनेमामध्ये शाहरुखची लेक सुहाना खानही दिसणार आहे. या सिनेमात बापलेकीची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याचवर्षी हा सिनेमा रिलीज होणार असल्याने आता चाहत्यांना फार वाट पाहावी लागणार नाही.
हेही वाचा:
Malthan : दोन दिग्गज उमेदवार रिंगणात; खडकी गटाची लढत जिल्ह्यात लक्षवेधी





