हे सेलिब्रिटी शाहरुखसोबत ‘जवान’मध्ये दिसणार आहेत
\nशाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाला मिळालेल्या जबरदस्त यशानंतर चाहत्यांच्या नजरा आता ‘जवान’वर खिळल्या आहेत. चित्रपटात दक्षिणेतील एक मोठी स्टार कास्ट आहे, या चित्रपटात शाहरुख खान दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.शाहरुख खान व्यतिरिक्त या चित्रपटात नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय सान्या मल्होत्रा, प्रियामणी, सुनील ग्रोव्हर हे देखील या चित्रपटात दिसणार आहेत. ‘जवान’मध्ये दीपिका पदुकोण, थलपथी विजय आणि संजय दत्त यांच्या छोट्या भूमिका आहेत.