‘प्रभू श्री राम’ सर्वांचे, श्री रामचा नारा देत ‘शबनम’ मुंबईहून अयोध्येला करणार पायी वारी

मुंबई – रामनगरी अयोध्येत 22 जानेवारीला भगवान श्रीरामाच्या मूर्तीचा अभिषेक होऊन स्थापना करण्यात येणार आहे. त्यामुळे देशभरातून मोठ्या संख्येने लोक अयोध्येला पोहोचण्याची शक्यता आहे.
लोक आपापल्या परीने राम मंदिराची स्थापना संस्मरणीय बनवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मुंबईतील शबनम शेख या मुस्लिम तरुणीची सध्या देशभरात चर्चा आहे. शबनम तिचे मित्र रमण राज शर्मा आणि विनीत पांडे यांच्यासोबत मुंबईहून अयोध्येला पायी वारी करणार आहे.
शबनमला पोलिस संरक्षण मिळाले आहे. प्रभू रामाच्या मूर्तीच्या स्थापनेत सहभागी होण्यासाठी ती बाहेर पडली आहे. शबनमने सांगितले की, तिला मुस्लिम असल्याचा अभिमान आहे. मुलगीही पायी प्रवास करू शकते. हे दाखवण्यासाठी ती प्रवासाला निघाली आहे. केवळ मुलेच पायी प्रवास करू शकत नाहीत, मुलीही करू शकतात हा लोकांचा गैरसमज मोडून काढावा लागेल, असे ती म्हणाली आहे.
प्रभू श्री राम यांचे दर्शन घेण्यासाठी हिंदू असण्याची गरज नाही
प्रभू श्री राम सर्वांचे आहे. रामाचे दर्शन घेण्यासाठी हिंदू असण्याची गरज नाही. चांगली व्यक्ती असणे महत्वाचे आहे. त्याचे हृदय शुद्ध असावे. रामजी भारतासह संपूर्ण जगाचे आहेत. आपल्या प्रवासाबाबत ती पुढे म्हणाली की, वाटेत काही मुस्लिम भेटले. ते नमस्कार करतात. जय श्री राम असेही म्हणतात. ती अयोध्येला कधी पोहोचेल हे अजूनही माहित नाही. श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाबद्दल ती खूप उत्सुक आहेत. सर्वत्र जय श्री रामचा नारा देत ती अयोध्येला जात आहे.





